नांदेड – महेंद्र गायकवाड
वादग्रस्त विधान करुन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तेलंगणातील आ.टि.राजासिंग याची बिलोली येथे होणारी सभा व रॅली रद्द करावी अशी मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदनाद्वारे आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफने केली.
हिंदू महागर्जना रॅली व सभेच्या माध्यमातून वादग्रस्त विधान करून समाजात धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी तेलंगाणाचे वादग्रस्त आ.टी.राजासिंग च्या विरोधात गेल्या तीन महिण्यात लातूर, अहमदनगर, औरंगाबाद आदी ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याअगोदर सुध्दा आ. राजासिंगच्या विरोधात असंख्य गुन्हे दाखल आहेत. तरी नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे हिंदु महागर्जना रॅलीच्या निमित्ताने आ.राजासिंग यांची सभा आयोजित करण्यात आल्याचे बँनर प्रसिद्धीपत्रकावरून कळाले. जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने वादग्रस्त आ.राजासिंग यांची सभा व रॅली रद्द करावी अन्यथा आॅल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक यांना देण्यात आले.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष रियाज शेख, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सोनसळे, जिल्हा महासचिव वलिओद्दीन फारुखी, शेख हसनोद्दीन सह बिलोलीचे सय्यद सद्दाम, शेख मगदूम, युसुफ खान, शेख अबरार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.