दानापुर – गोपाल विरघट तेल्हारा तालुक्यातील दानापूर सारख्या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासासाठी अभ्यासिका मोफत सुरू करणे हा एक स्तुत्य उपक्रम आहे असे उदगार मराठी पत्रकार परिषद चे माजी अध्यक्ष सिद्धार्थजी शर्मा यांनी केले.
तसेच आयोजित कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब यांनी तेल्हारा तालुक्यातील पत्रकारितेची पार्श्वभूमीवर बोलताना चाळीस वर्षातील तेल्हारा तालुक्यातील पत्रकारिता समाजाभिमुख होती व आजही तशीच दिसते स्व.पुंडलीकराव घायल, स्व.भाई प्रभाकरराव सावरकर यांचा काळ पाहिला आज दुसऱ्या पीढीत मुलांना पाहतोय, तेल्हारा पत्रकारांन बद्दल नेहमीच कौतुक आहे असेही त्यांनी सांगितले.
दानापूर येथील जेष्ठ पत्रकार तथा भारतीय सैनिक स्व. पुंडलीकराव घायल यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रेरणेने 2012 पासून सुरू झालेल्या अभ्यासिकेचे लोकार्पण आज दिनांक 27 जूलै पुण्यतिथी दिनी लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,
नायब तहसीलदार विलास राणे, पोलीस उपनिरीक्षक तेल्हारा गणेश कायंदे, जि प सदस्य गजानन काकड, तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रल्हादराव ढोकणे, ज्येष्ठ पत्रकार सुरेशराव शिंगणारे, सत्यशील सावरकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौदंळे, सरपंच सौ. सपनाताई वाकोडे यांची उपस्थित होती. सर्व प्रथम मान्यवर यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती माता, स्व पुंडलीकराव घायल,
भारतरत्न स्व डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभ्यासिकेचे फित कापून लोकार्पण करण्यात आले.यावेळी विनय घायल यांनी प्रास्ताविकातून पुंडलीकराव घायल यांच्या कार्यावर प्रकाश टाकला तसेच नायब तहसिलदार राणे व पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करताना गावा गावात अभ्यासिकेचे महत्व पटवून दिले आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही सुविधा विनय घायल यांनी उपलब्ध करून दिली अभिनंदनीय कार्य असल्याचे म्हटले व विद्यार्थीना स्पर्धा परीक्षा अभ्यासा करिता पुस्तकांची मदत देण्याचे जाहीर केले तर सिध्दार्थ शर्मा,
शौकतअली मिरसाहेब, सूरेशराव शिंगणारे सर यांनी पुंडलीकराव घायल हे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे अभ्यासु कणखर पत्रकार होते. त्यांनी त्याकाळात अनेक आघात सोसले व जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला. जि प सदस्य गजानन काकड यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपसरपंच सागर ढगे, महादेव महाले, पत्रकार सदानंद खारोडे, प्रा. विद्याधर खुमकर,संजय घायल ASI अकोट, मुख्याध्यापक श्रीराम डाबरे , प्रल्हादराव घायल,पत्रकार सुनिल धुर्डे,शेख राजू, महादेव वानखडे, सखाराम नटकुट, गोपाल विरघट,नंदु नागपूरे योगेश अटराळे, पटवारी अंकुश मानकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माकोडे सर यांनी तर आभार संजय हागे यांनी व्यक्त केले.