अकोला : हत्या, अपहरण, डकैती सारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी आता अकोला पोलिसांचं नाव बदनाम होत आहेत, काल रात्रीच्या घटनेने तर शहर हादरून गेलं रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रायली जीन परिसरात राहणारे व्यावसायिक अरुण वोरा यांचे सोमवारी रात्री दहा साडे दहाच्या सुमारास सर्वांसमोर अपहरण झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. सामान्य नागरिकांबरोबर आता अकोला शहरातील व्यापारीही सुरक्षित नसल्याचे चित्र अकोल्यात दिसत आहे. काल रात्रीच्या घटनेने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
काल रात्री शहरातील व्यवसायीक अरुण वोरा यांचे व्हॅनमध्ये आलेल्या काही अज्ञात आरोपींनी अपहरण केले घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज बहुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.
व्यावसायिक अरुण वोरा हे रिकाम्या बाटल्यांचे मोठे व्यापारी मानले जातात. वोरा यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाचे अपहरण करणारे आरोपी हे पांढऱ्या रंगाच्या कारमधून प्रवास करत होते. ते जवळपास 3 तास घटनास्थळी व्यावसायिकाची वाट पाहत थांबले होते. संधी मिळताच त्यांनी व्यावसायिकाचे अपहरण केले. अपहरण झाले त्यावेळी रस्त्यानी वर्दळ होती.
शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली असून तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
काही महिन्यांपूर्वी याच भागातील अलंकार मार्केट मध्ये एका रात्रीत आठ नऊ दुकानं फोडून चोरीची घटना झाली होती. तसेच काही दिवसापूर्वी एका उद्योगपतीच्या घरी चोरीची घटना घडली.तर आज व्यावसायिकाचे वर्दळीच्या रस्त्याहून अपहरण झाल्याची घटना घडली, यामुळे अकोल्यातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे