Aaron Bushnell : अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील इस्रायली दूतावासाबाहेर हवाई दलाच्या जवानाने स्वतःला पेटवून घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी ही घटना घडली. इस्रायली दूतावासाजवळ उभे असताना या व्यक्तीने स्वत:ला पेटवून घेतले. यानंतर, यूएस सीक्रेट सर्व्हिस अधिकारी आणि डीसी फायर ब्रिगेडने आग विझवली आणि त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
स्वत:ला पेटवून देणाऱ्या व्यक्तीचे नाव ॲरॉन बुशनेल असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक मीडियानुसार, ही व्यक्ती यूएस एअर फोर्सचा सक्रिय सैनिक आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये आरोन म्हणतो की, तो या हत्याकांडात सहभागी होणार नाही.
व्हायरल झालेल्या या घटनेच्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, आरोन सर्वप्रथम इस्त्रायली दूतावासाच्या समोर जमिनीवर रेकॉर्डिंग डिव्हाइस ठेवतो. यानंतर तो फ्री पॅलेस्टाईनचा नारा देत स्वत:वर द्रव शिंपडतो आणि स्वत:ला पेटवून घेतो. या घटनेनंतर पोलिस अधिकारी त्याकडे जाताना आणि आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
रिपोर्ट्सनुसार, एअरमनने स्वतः संपूर्ण घटनेचे लाईव्ह स्ट्रीम केले. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ ट्विच प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाल्यानंतर अनेक चॅनेलवरून काढून टाकण्यात आला. अमेरिकन सीक्रेट सर्व्हिससोबतच हवाई दलानेही या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आरोनवर सध्या उपचार सुरू आहेत, मात्र तो गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Loved ones of Aaron Bushnell, 25, reached out to me and gave me consent to post a blurred version of Bushnell’s protest today against genocide in Palestine.
— Talia Jane ❤️🔥 (@taliaotg) February 26, 2024
“Aaron is the kindest, gentlest, silliest little kid in the Air Force,” said Errico, who met Bushnell in 2022. https://t.co/oQFc5r5XFo pic.twitter.com/wpRKVb8KSW