नविन डाॅक्टरची नियुक्तीच नाही…जुने डाॅक्टर गेले दवाखाना सोडून…रुग्ण झाले वाऱ्यावर
पारशिवनी
महाराष्ट्रात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील ” आपला दवाखाना ” असावा या संकल्पनेला दुजारा देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात 700 ” आपला दवाखान ” ही योजना प्रारुपास आणली. मात्र पारशिवनी शहरातील आपला दवाखाण्याचा शुभारंभ झाल्यानंतर येथील डाॅक्टर गेल्या काही दिवसातच सोडून गेल्यामुळे सध्या तालुकावासीयांसमोर प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. त्यामुळेच तालुक्यातील काही अस्वस्थ व्यक्ती या योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे सांगतात .
पारशिवनी येथे गेल्या काही दिवसाआधी या क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थीतीत ” आपला दवाखाना ” या योजनेचे उद्घाटन 1 मे ला उद्घाटन करण्यात आलेले होते. यावेळी जि.प.चे शिक्षण सभापती राजु कुसुंबे , जि.प.सदस्य अर्चना भोयर , पंचायत समिती सभापती मंगला निंबोने , उपसभापती करुणा भोवते , चेतन देशमुख , तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रशांत वाघ व इतरही तालुक्यातील नागरीक प्रामुख्याने उपस्थीत होते. यावेळी डाॅ.विकास जुनघरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यापासुन डाॅ. विकास जुनघरे यांनी या पदाची धुरा सोडल्यामुळे तब्बल दीड महिन्यापासुन येथे कोणताही डाॅक्टर ची नियुक्ती येथे करण्यात न आल्यामुळे , तालुक्यातुन येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे.
या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला दवाखाना ही योजना नावारुपास आणली. हे तितकेच खरे ! मात्र ग्रामीण भागात ही योजना नावारुपास येणे हे कठीण आहे. पारशिवनी तालुक्यात 117 गावे येत असुन , 1,41 ,570 लोकसंख्या आहे. क्षेत्रफळाणे विस्तीर्ण व अधिकाधिक आदिवासी समाज बांधवांचा तालुका आहे. या पारशिवनी तालुक्याचा ठिकाणाहुन घाटपेंढरी हे 55 कि.मी अंतर आहे. इतक्या दुरवरुन येणाऱ्या रुग्णाला जर आरोग्यसेवा मिळाली नाही , तर या योजनेचा फायदाच काय ? अशी सध्या तालुक्यात चर्चा आहे. तालुक्याचा ठिकाणी कुणी नावेने , कुणी बैलगाडीने तर कुणी पायपीट करीत येत असतात. अश्या तालुक्याचा ठिकाणी राज्य शासनाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याचेही विरोधी पक्षातील कार्यकर्ते बोलत आहे.
या क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांनी लक्ष देण्याची गरज
या क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांनी ” आपला दवाखाना ” चे उद्घाटन झाल्यानंतर कधीही येऊन बघीतले नाही. ही एक शोकांतीकेची बाब आहे. येथील डाॅक्टर गेल्या दीड महिन्यापासुन कार्यरत नसुन , याचा साधा मागोवा सुद्धा घेतलेला नाही. तसेच सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असुन , याबाबतीत एक तारांकीत प्रश्नही मांडला नसल्याचा आरोप पारशिवनी येथील सामाजीक कार्यकर्ता रविंद्र ऊर्फ बाबु तरार यांनी व्यक्त केला आहे.