Monday, December 23, 2024
Homeराज्यरोटी फाउंडेशन चा आधार दुर्गम भागातील मुलीला यशाचे शिखर गाठण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर...

रोटी फाउंडेशन चा आधार दुर्गम भागातील मुलीला यशाचे शिखर गाठण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हर मुलीला दिला उच्च शिक्षणासाठी पाच लाखाचा चेक…

गडचिरोली – अतिदुर्गम भाग सिरोंचा तालुक्यतील रेगुंटा येथील किरण कुर्मा वार हिला उच्च शिक्षणासाठी लंडन येथे जायचे होते तिची हालाखीची परिस्थिती आहे ही स्वतः आपल्या वडिलांसोबत ड्रायव्हरकी करून उदरनिर्वाह करीत आहे यातच तिने उस्मानाबाद इथून उच्च शिक्षण घेतले आहे पुढील शिक्षणासाठी तिला लंडन येथे जायचे आहे करिता ही बातमी न्यूज चैनल वर आली आणि ही बातमी बघून रोटी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर रोहितजी माडेवार यांनी त्वरित मदतीचा हात समोर केला,

आणि त्यांनी चौकशी करून अहेरी तालुक्यातील रवी नेलकुद्री यांच्याशी संपर्क केला आणि रवी यांनी तिचा संपर्क नंबर शोधून तिच्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर आज तिला डॉक्टर रोहितजी माडेवार, रोटी फाउंडेशन यांनी पाच लाख रुपयाचा चेक दिला व तिला भविष्यात येणाऱ्या सर्व अडथळे दूर करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन पण दिले यावेळी अहेरीचे माझी मंत्री अमरीश राजे आत्राम उपस्थित होते त्यांच्या हस्ते हा चेक तिला प्रदान करण्यात आला.

यावेळी जन संघर्ष समिती चे अध्यक्ष दत्ता शिर्के , प्रशांत शेंडे , प्रशांत नामेलवार ,राकेश , विनोद गिल्लेवार , डॉ तिरुपती कोलावर , डॉ स्नेहल मेक्रतवार , रेगुंटा चे प्रभारी सानप साहेब, सूचित कोडेलवार ,प्रमोद भोयर , संतोष पडलवार , मल्लांना संघरथी , अजयजी , मुकेशी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: