- गणेश रामभाऊ बोरेकर असे मृत तरुणाचे नाव.
- नागपूर वरून परत येताना झाला अपघात.
- मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तरुणांनी काढले गाडी बाहेर.
नरखेड – अतुल दंढारे
नरखेड – मंगळवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास अर्क्टिका गाडी पलटी झाली असून त्यातील चालक गणेश रामभाऊ बोरेकर वय वर्ष 28 रा. मदना या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्य झाला. गणेश मंगळवारी मदना येथील रुग्ण घेऊन आपल्या गाडीने नागपूर येथे गेले. इथे त्याने त्या रुग्णाला रुग्णालयात भरती केले व तो परत गावाच्या दिशेने निघाला.
रात्री 11 वाजता त्याने गावातील एका तरुण फोन केला व मी कळमेश्वर पर्यंत पोहचलो आहे असे सांगितले. तो आपल्या गावाच्या दिशेने निघाला जलालखेडा ते मदना बायपास रस्त्यावर त्याचा रात्री 1 च्या सुमारास त्याची अर्क्टिका गाडी पलटी झाली असल्याचा अंदाज बांधल्या जात आहे.
बुधवारी सकाळी 5.30 वाजता जलालखेडा येथील तरुण मॉर्निंग वॉकला जात असतात. सुनील कडू, नितीन खडसे व गजानन निमजे हे तिन्ही तरुण बुधवारी सकाळी 5.30 वाजता मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना MH -40-AC-1008 पांढऱ्या रंगाची अर्क्टिका गाडी मदना ते जलालखेडा या बायपास रस्त्यावर सुनील नीमजे यांच्या शेतात पलटली झालेली दिसली असता त्यांनी गाडी जवळ जाऊन बघितले असता एक तरुण त्यात अडकला होता. युवकांनी त्या तरुणाला काढण्याचा प्रयत्न केले परंतु गाडी पलटी झाली असल्यामुळे त्यांना शक्य झाले नाही.
या तिन्ही व्यक्तीनं जवळ मोबाईल नसल्यामुळे त्यातील सुनील कडू नावाचा तरुण धावत जलालखेडा येथे आला व त्याने गावातील नागरिकांना घटनास्थळी नेले व त्या तरुणाला गाडी बाहेर काढून उपचारा करिता प्राथमिक आरोग्य केंद्र जलालखेडा येथे आणले असता त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्यामुळे त्या तरुणाला उपचारासाठी नागपूर येथे पाठवण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती जलालखेडा पोलिसांना देण्यात आली आहे.
सूनीलकडू या युवकाने केले शर्तिचे प्रयत्न.
पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या तिन्ही तरुणांनी सोबत मोबाईल नेले नसल्यामुळे त्यातील सुनील कडून नावाच्या तरुणाने 2 किलोमीटर धावत जलालखेडा येथे येऊन गावातील तरुणांना गोळा करून घटनास्थळी नेले व गाडीत अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सुनील कडू यांचे सर्वत्र कौतुक होत असून. त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद असून त्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देण्यात यावे नामांकित करावे अशी मांगनी सर्वत्र होत आहे.