Sunday, December 22, 2024
HomeSocial Trendingअल्पवयीन पुतणी पडली काकाच्या प्रेमात…आणि मग…

अल्पवयीन पुतणी पडली काकाच्या प्रेमात…आणि मग…

न्यूज डेस्क – उत्तर प्रदेश मधील कुशीनगरच्या तमकुहिराज येथील स्थानिक पोलीस ठाण्यात शनिवारी एक विचित्र प्रकार उघडकीस आला. एक 16 वर्षांची मुलगी तिच्या 20 वर्षांच्या प्रियकराशी लग्न करण्यावर ठाम होती, तो नात्याने काका लागते. मात्र तिची कायद्यापुढे चालत नसल्याने तिच्या प्रियकराला पोलिसांनी रात्रीच पोलिस ठाण्यात आणले होते. तिनेही त्याला वाचविण्यासाठी पोलीस ठाणे गाठले.

मिळालेल्या माहितीनुसार, तमकुहीराज नगरातील या मुलीचे प्रेम तिच्या काकासोबत सुरु होते, याचं तीन वर्षांपूर्वी पासून एकमेकांवर प्रेम जडले होते. दोघेही एकमेकांना गुप्तपणे भेटत होते. गावातील लोकांनी दोघांनाही अनेकदा पकडले होते. याची तक्रारही कुटुंबीयांकडे करण्यात आली. तरीही दोघेही आपापल्या कृत्यापासून परावृत्त झाले नाहीत.

याठिकाणी मुलीच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी रात्री उशिरा प्रेमी युगल भेटताना पकडले. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

शनिवारी तरुणीने प्रियकराशी लग्न करण्यास होकार दिला. दमदाटी करत पोलीस ठाणे गाठून तिने प्रियकराशी लग्न करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यास सुरुवात केली. ही बाब समजल्यानंतर सुमारे 100 जणांनी पोलिस ठाणे गाठून विरोध केला.

त्या लोकांचे म्हणणे आहे की, कोणत्याही परिस्थितीत चुकीची प्रथा सुरू होऊ दिली जाणार नाही. तमकुहिराज पोलिस स्टेशनचे एसएचओ नीरज कुमार राय यांनी सांगितले की, तक्रार अद्याप मिळालेला नाही. तक्रार मिळताच कायदेशीर कारवाई केली जाईल.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: