कोल्हापूर – राजेंद्र ढाले
संपूर्ण गाव दुःख सागरात बुडाला.
गेल्या दोन वर्षापासून गणपती उत्सव साजरा न झाल्याने यावर्षी ग्रामीण भागामध्ये सुद्धा गणपती उत्सव गावातील तरुण मंडळे जोरदार पने साजरा करत आहेत. संपूर्ण गाव गेल्या आठ ते दहा दिवसापासून मंडप ,डेकोरेशन, सजावट व मूर्ती आणण्यापर्यंत जोरदार तयारी करत आहे. हे सर्व करत असताना यामध्ये कणेरीवाडी तालुका करवीर येथील दिलदार तरुण मंडळाचा तरुण कार्यकर्ता भूषण सुद्धा आपल्या मंडळाचा गणपती आणण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून मंडपाची सजावट करण्यापासून मिरवणूक आखण्यापर्यंतच्या नियोजनामध्ये धडपडत होता.
बुधवारी रात्री भूषण आपल्या मित्रमंडळींच्या बरोबर गणपती आणण्यासाठी गेला बाहेरील गावातून गणपती गावात घेऊन येत असताना गावच्या वेशीवरच भूषण पांडुरंग खोत( वय 22 )या तरुणाला या मिरवणुकीतच हृदयविकाराचा अचानक जोराचा झटका आला. त्याला बेशुद्ध होताना पाहून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्यानंतर त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. यानंतर मंडळातील सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबरच संपूर्ण गावाला आश्चर्याचा धक्काच बसला. गेल्या आठ दिवसापासून सातत्याने मंडळाचा गणपती आणि सजावट आणि मिरवणूक आणण्यासाठी धडपड करणारा आपला भूषण आपल्यातून असा अचानक जाणे हे कोणालाही या ठिकाणी न पटण्यासारखे होते.
त्यामुळे बुधवारी रात्री या प्रसंगाने सगळेच आश्चर्यचकित झाले. भूषण हा नेहमी हसरा व अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांशी मस्करी हसत खेळत चेष्टा मस्करी करणारा हा एक वेगळाच तरुण होता .त्यामुळे याच्यात जाण्याने संपूर्ण गावावर शोक कळा पसरली. गावात संपूर्ण वाजणारे डीजे, लाऊड स्पीकर पूर्णतः बंद झाले. गावात एकच शांतता पसरली आणि प्रत्येकाला दुःख झाले ते भूषण याच्या एक्झिटचे भूषण उंचगाव येथील घाडगे पाटील इंडस्ट्रीज मध्ये काम करत होता. त्याच्यामागे त्याचा लहान भाऊ ,आई-वडील चुलते असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी ठेवले आहे.