Saturday, December 21, 2024
Homeगुन्हेगारीपातुर शहरात इलेक्ट्रिक शॉक लागल्याने एका तरुणाचा जागेवर मृत्यू...

पातुर शहरात इलेक्ट्रिक शॉक लागल्याने एका तरुणाचा जागेवर मृत्यू…

पातुर : आज सकाळी झालेल्या घटनेने संपूर्ण पातुर शहर हादरले आहे सविस्तर वृत्त असे आहे की पातुर शहरात देवळी मैदान किल्ला या भागातील काही मजूर वर्ग दैनंदिन रोजच्या कामाला जात होते हे सर्व मजूर वर्ग एका माल वाहक वाहनाने पातुर जवळ असलेल्या सबस्टेशन बाजूच्या कॅनॉल लगत रस्त्याने जात असताना इलेक्ट्रिक पोल वरील विद्युत तारांचा या वाहणाला स्पर्श झाल्याने संपूर्ण वाहनांमध्ये करंट आला व सर्व मजूर वर्गांनी वाहनातून उड्या घेतल्या या विद्युत वाहिनी च्या संपर्क मध्ये या मजुरापैकी एक इसम ज्याला जबर शॉक लागला असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचाराकरिता त्याला आणले असता पातुर प्राथमिक उपचार केंद्राचे डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केले.

या मृतकाचे नाव शेख मुख्तार शेख मेहबूब असून यामध्ये जखमी झालेल्या इसमाचे नाव शेख सलीम शेख मुसा आहे पुढील तपास पातुर पोलीस स्टेशन ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून पंचनामा करण्याकरता पातुर पोलीस स्टेशनचे भास्कर इंगळे व अभिजीत आसोलकर यांनी केला आहे मृतक मुख्तार शेख महबूब याला शवविच्छदनाकरिता जिल्हा रुग्णालय येथे पाठवले आहे.

यावेळी पातुर शहरातील पत्रकार दूले खा युसूफ खान स्वप्निल सुरवाडे, किरण कुमार निमकंडे , सैय्यद साजिद,प्रमोद कढोणे यांनी पातूर येतील प्रथम उपचार केंद्र येथे पोलीस प्रशासन व शासकीय आरोग्य रुग्णालयाला मदत केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: