अमरावती – सुनील भोले
स्वराध्या एंटरटेनमेंट श्री दिनकर तायडे, सौ स्वामिनी तायडे व मनीष पाटील फाउंडेशन द्वारा आयोजित इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड दिनांक ४ जानेवारी ते २१ जानेवारी पर्यंत सलग 18 दिवस 18 रात्र आपल्या अंबानगरीमध्ये प्रथमच ४०१
तासांचा वल्ड रेकॉर्ड चालणार आहे.
स्थळ अभियंता भवन अमरावती येथे समर्पण प्रतिष्ठान निराधार महिला दिव्यांग अनाथ कॅन्सर व देहदान नेत्रदान जनजागृती साठी झाडे लावा झाडे जगवाजनजागृती अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविले जाईल आपल्यामध्ये नृत्य, गायन, वादन, मॉडलिंग, नाटक, शेरोशायरी, पाक कला, जिम्नॅस्टिक, योगा इत्यादी कोणतीही कला असेल तर या रेकॉर्डमध्ये आपल्याला सादर करता येईल यामध्ये आपण ग्रुप किंवा एकत्र सुद्धा सहभागी होऊ शकता.
यामध्ये सहभागी कलावंतास या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र व मेडल देण्यात येईल. यामध्ये वयाची कोणतीही अट नाही. तरी आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मंडळीतर्फे करण्यात आले.
पत्रकार परिषदेला उपस्थित श्री मनीष पाटील, श्री दिनकर तायडे, सौ स्वामिनी तायडे,श्री दिलीप हटवार, श्री राजेंद्र ठाकरे, श्री जितेंद्र बघेल, श्री प्रभुदास फंदे, श्री चंद्रकांत पोपट, श्री गणेश बिजवे, श्री पराग अंबडकर, श्री मयूर डहाके…
कार्यक्रमाचे स्थळ अभियंता भवन, अमरावती.
दिनांक ४ जानेवारी ते २१ जानेवारी