Sunday, December 22, 2024
Homeराज्यचोरीचा सुगावा लपवीन्याच्या हेतूने केला महिलेचा खून...नरखेड तालुक्यातील मोवाड येथील घटना...

चोरीचा सुगावा लपवीन्याच्या हेतूने केला महिलेचा खून…नरखेड तालुक्यातील मोवाड येथील घटना…

नरखेड – अतुल दंढारे

चोरी करण्याच्या ऊद्देशाने राम मंदीराच्या चैनल गेटचे कुलूप तोडतांनी महीलेने बघीतले व ती आपले नाव सांगणार या भीतीने तिला विशीष्ठ वस्तुने ठेचुन तिचा मृतदेह आठवडी बाजारातील नालीत फेकला.

मोवाड शहरातील मन खिन्न करणारी ही घटना अधीक मासाच्या पुर्व संधेला ता. १७ जुलै रोजी मध्यरात्री च्या दरम्यान आठवडी बाजारात घडली. ही घटना घडली तेव्हा लाईट बंद होती का?

आणि नेमकं तेव्हाच ही घटना घडली का हे मात्र अनिश्चित आहे.जर लाईट बंद असेल तर त्याच अंधाराचा फायदा घेत चोरट्यानी महिलेचा खून करणारी ही पहिली घटना मोवाड शहरात घडल्याचे ताजे उदाहरण आहे. कारण दररोज अलीकडे रात्रीला अवेळी गावातील विद्युत पुरवठा बंद होत आहे.

बाजारात असलेले राम मंदिराच्या गेटचे पहिले लॉक चोरट्यानी तोंडले तर दुसरे लॉक तोडत असतानी त्यावेळेस मनीषा आपटे (वय ५५) रा.मोवाड ही महिला थोडी दिमाकात कमजोर असलेली महिला रात्री बे रात्री गावात घुमत असते अशातच तिचा चक्कर या राम मंदिराकडे झाला असता चोरी करणारे चोरटे मंदिराचे दुसरे लॉक तोडतानी मनीषा आपटे या महिलेला दिसलें असेल तिच्या ईशारामुळे त्याना वाटले की ही आपल्याला अडथळा आणेल व आपली माहिती सांगेन या हेतूनेच तिचा खून करून मृत्यूदेह बाजारातील शॉपिंग सेंटरला लागून असलेल्या नाली मध्ये नेऊन टाकला व तेथुन पळ काढला.

जातांनी येथील नागरीक पांडुरंग वाघे यांच्या घरची अंगणात असलेली मोटरसाईकीलही चोरट्यांनी नेली. खुन करून कदाचीत या मोटरसायकलने मारेकर्‍यांनी पळ काढला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ता. १८ ला सकाळी माॅर्नींग वाॅकला फीरणार्‍या नागरीकांना नालीमध्ये तीचा मृतदेह व रस्त्यावर रकरक्ताचा सडा पडलेला आढळला. तिचा संपुर्ण चेहरा व डोक्यावर विशीष्ट वस्तुने ठेचुन निर्घुनपणे हत्या करण्यात करण्यात आल्याने संपुर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गावकर्‍यांनी लगेच नरखेड पोलीस स्टेशनला धूरध्वनी करून घटनास्थळी पोलीसांना पाचारण करण्यात आहे. नालीतुन मनिषाचा मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. मृत मनिषाला एक १८ वर्षाचा मुलगा आहे. तो गावातील चार घरचे भांडी घासुन आपले आईचे भरण पोषन करीत होता. आधी बाबा व आता आई गेल्यामुळे तो पोरका झाला आहे.

याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध भांदवीच्या कलम 302, 201 ,हा गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास उच्च स्तरीय चौकशी स्कॉटडॉग, सायन्टिक इन्व्हिटेशन पोलीस पथकाद्वारे होत असुन वरिष्ठ पोलीस विजय माहुलकर पोलिस उप अधिक्षक काटोल, यांचे मार्गदर्शनाखाली नरखेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा तिवारी, शिपाई सनेचर, शिपाई गणेश ताजने, तपास करत आहे. बाजारातील राम मंदीरातील चोरीचा हा दोन वर्षातील दुसरा प्रयत्न आहे. आरोपी मात्र मोकाट आहेत हे मात्र विशेष.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: