Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीमुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार...व्हिडिओही बनवला...अन...

मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार…व्हिडिओही बनवला…अन…


न्युज डेस्क – देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही घटना कुर्ला भागातील असल्याचे त्यांनी सांगितले. येथे बुधवारी सकाळी तीन जणांनी एका ४२ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा प्रायव्हेट पार्ट सिगारेटने जाळला. सध्या महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच महिला आयोगाने या कृत्याची दखल घेतली आहे.

कुर्ला पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेवर बलात्कार करताना घटनेचा व्हिडिओ बनवला. तसेच याबाबत पोलिसांना किंवा अन्य कोणाला सांगितल्यास हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करू, अशी धमकीही दिली. त्यानंतर महिलेने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. महिलेचे हाल ऐकून शेजाऱ्यांनी एका एनजीओशी संपर्क साधला आणि याप्रकरणी एफआयआर दाखल केला.

कुर्ला पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने महिलेवर बलात्कार करताना घटनेचा व्हिडिओ बनवला. तसेच याबाबत पोलिसांना किंवा अन्य कोणाला सांगितल्यास हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करू, अशी धमकीही दिली. त्यानंतर महिलेने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. महिलेचे हाल ऐकून शेजाऱ्यांनी एका एनजीओशी संपर्क साधला आणि याप्रकरणी एफआयआर दाखल केला.

पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार), ३७६डी (सामूहिक बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध), ३२४ (खतरनाक शस्त्राने स्वेच्छेने दुखापत करणे) आणि इतर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि पीडित तरुणी एकाच वस्तीत राहत असल्याची माहितीही त्यांनी दिली. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: