अहेरी – स्त्री ही कुटूंबाला संस्कार देऊन जोडनारी मोठी शक्ती असून राष्ट्रनिर्मानाच्या कार्यात तिचा मोलाचा वाटा आहेरथसप्तमीच्या पावन पर्वावर राम मंदिर महिला असे प्रतिपादनह.भ.प. सविता जयंतराव खरवडे समिती तथा धर्मजागरण यांनी केले.
त्या महिला कार्य अहेरी जिल्ह्याच्या वतीने आलापल्ली येथील राम मंदिर इथे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम तथा भारतमाता पुजनाचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाला ह.भ.प. सविताताई जयंतराव खरवडे ह्या प्रमुख वक्ता म्हणुन उपस्थीत होत्या, कार्यक्रम अतीशय सुंदर पद्धतीने झाला, प्रथम महिलांचा सत्संग, भजन झाले, नंतर भारतमाता पुजन,
त्यानंतर सविताताईंचे मार्गदर्शन लाभले त्यानंतर धर्मजागरण महिला समिती आलापल्ली च्या महिलांनी धर्मांतरण या विषयावर छोटीसी नाटीका सादर केली व शेवटी सगळ्या महीलांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम झाला, कार्यक्रमाला साधारणतः १५० ते १६० महिला उपस्थीत होत्या . कार्यक्रमाला चन्द्रपूर विभाग संघचालक जयंतराव खरवडे हे पूर्णवेळ उपस्थित होते.