कवठा खोलापूर येथे सायंकाळच्या वेळेस शेतकरी शिवाराच्या सगराने घरी जात असताना अचानकपणे रानडुक्कर अंगावर आले व शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करून खांदा,पोट व पायाला जखमा करून रक्तबंबाळ केले, शेतकऱ्याचे नाव गुलचंद बळीराम डोंगरे असे असून जखमी अवस्थेत नितीन देशमुख व भरत वाकोडे यांना ते दिसून पडले.
नंतर ते व गावकऱ्यांनी तात्काळ सामान्य रुग्णालयात जाऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शेतकरी आर्थिक परिस्थितीने गरिब असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
रब्बी पिक असो की खरीप पिक असो दरवर्षी रानडुक्कराचे अतोनात नुकसान पिकांचे करताना दिसतात, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो.
उन्हाळ्यामध्ये पाणी व चारा रानडुक्करांना मुबलक न मिळाल्याने चवताळून माणसांवर हल्ले करतात. याच्यावर वनविभागाने काही तरी उपाययोजना करायला पाहिजे, आणि जखमी व पिडीत लोकांना नुकसान भरपाई द्यायला हवे. तेव्हाच शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकते .