न्युज डेस्क – बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या गोड आवाजाचे अवघ्या जगात दिवाने आहेत, आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कैलाश खेर आज वेगळ्याच कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. कर्नाटकमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे.
माहितीनुसार, गायक कैलाश खेर यांच्यावर कर्नाटकात एका कॉन्सर्टदरम्यान हल्ला करण्यात आला आहे. वृत्तानुसार, कॉन्सर्टदरम्यान गायकावर बाटली फेकण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत कैलास खेर यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली.
कर्नाटकातील हम्पी शहरात कैलाश खेर यांच्या मैफिलीत प्रचंड गर्दी जमली होती आणि गायकावर त्याचवेळी एकाने पाण्याची बॉटल फेकून मारली. मात्र फेकून मारलेली बॉटल कैलाश खेर लागली नसली तरी एका कार्यक्रमात घटना घडणे हे सुरक्षेच्या दृष्टीने खूप गंभीर असल्याचे बोलले जात आहे. कैलाश खेर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हम्पीतील या कार्यक्रमाची माहिती दिली होती. रविवारी कैलाश खेर यांनी ट्विट करून लिहिले की, ‘भारतातील प्राचीन शहर, काळ खंड, मंदिरे आणि पोटमाळा, हम्पीच्या रूपात समाविष्ट केले जात आहे. कैलास बँडचा शिवनाद आज हंपी महोत्सवात गुंजणार आहे.