Friday, November 22, 2024
HomeMarathi News Todayजितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या महिला पदाधिकारीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला तो व्हिडीओ...

जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या महिला पदाधिकारीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला तो व्हिडीओ समोर आला…नेमके काय घडले?…पाहा Video

काल मुंब्रा येथील वाय जंक्शन पुलाच्या उद्घाटनावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या एका पदाधिकारी महिलने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. तर शिंदे-फडणवीस सरकारला कंटाळून ते आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी ट्वीट करून सांगितले.

या सर्व प्रकारावर आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या महिलेने आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला. ती महिला आधीच जामिनावर आहे. तसेच आव्हाड यांनी कार्यक्रमात ढकलल्यानंतर चार तासाने तुम्हाला ढकलल्याची जाणीव होते काय? असा सवाल करतानाच विनयभंग होतो तर मग गर्दीच्या ठिकाणी जाताच कशाला? असा संतप्त सवाल ऋता आव्हाड यांनी केला आहे. तर या घटनेचा Video आता समोर आला असून त्यात तुम्हाला कश्याप्रकारे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्या महिलेला ढकलले.

सौजन्य -Twitter

गुन्हा दाखल करणारी महिला भाजपच्या पदाधिकारी आहेत का? त्या कधी भाजपच्या तर कधी राष्ट्रवादीच्या स्टेजवर असतात. छठपुजेच्यावेळी मुंब्र्यात टेन्शन होतं. या महिलेने त्यावेळी बाचाबाची केली होती. काही कारण नसताना बोंबाबोंब केली होती. कारण नसताना त्यावेळी तिने आव्हाडांवर अर्वाच्य भाषेत कमेंट केली होती. त्यामुळे या महिलेच्या विरोधात गुन्हे दाखल असून ती आणि तिची मुलगी जामिनावर आहे. ती केस अजूनही सुरू आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा तिच्याकडे मोटीव्ह आहे, असं ऋता आव्हाड म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी होती. सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त होता. अशा ठिकाणी कुणी कुणाला बाजूला केलं तरी कुणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या महिलेलाही गर्दीमुळे खांद्याला धरून बाजूला केलं असेल. पण चार तासानंतर आपल्याला बाजूला केलं याची या महिलेला जाणीव कशी झाली? चार तासानंतर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय? हा काय पोरकटपणा आहे, असा संताप ऋता आव्हाड यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: