खामगाव तहसील कार्यलयच्या अनागोंदी कारभारी मुळे तहसील मधील विविध विभाग च्या समस्या ला त्रासून खामगाव येथे दिव्यांग बांधवांसाठी कार्य करणाऱ्या विराट मल्टीपर्पज फाउंडेशन खामगाव च्या वतीने मनोज नगरनाईक, शत्रुघ्न इंगळे यांच्या मार्गदर्शन खाली अनोखे धरणे आंदोलन टॉवर चौक खामगाव येथे दि 13/02/2023 सोमवार ला करण्यात येणार आहे,
या करिता रीतसर तहसीलदार यांना दिव्यांग व वंचित निराधार यांच्याशी भेदभाव करणारे तसेच कर्तव्यात कसूर करणारे पुरवठा निरीक्षक यांची खुली चौकशी करत कार्यवाही करण्यात यावी, रेशन विभाग मध्ये मंजुरीसाठी दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दिव्यांग लाभार्थी यांची अंतोदय योजनेत समावेश करण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, संजय गांधी निराधार ची प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, उप विभागीय कार्यलय महसूल येथे जाण्या येण्यासाठी रॅम ची व्यवस्था करण्यात यावी,
तहसील कार्यलय अथवा खुली जागा किंवा बंद असलेल्या झुणका भाकर केंद्र येथे दिव्यांग बचत गट वा दिव्यांग संस्थेला देण्यात यावे, मा प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बांधवाना सरक्षण देणाऱ्या दिव्यांग कायदा 2016 ची जनजागृती करण्यात यावी असे स्मरण नायब तहसीलदार श्री हेमंत पाटील यांना पत्र देण्यात आले या निवेदन च्या प्रती पालकमंत्री बुलढाणा,खासदार प्रतापराव जाधव,जिल्हाधिकारी बुलढाणा,युवा आमदार आकाश फुंडकर,
उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव शहर पोलीस स्टेशनमाहिती साठी व उचित कार्यवाही साठी देण्यात आल्या आहे या निवेदन देतेवेळी विराट मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष मनोज नगरनाईक, प्रहार अध्यक्ष शत्रुघ्न इंगळे,प्रहार तालुका उपाध्यक्ष दीपक धुरंधर, अपंग जनता दल चे शेखर तायडे, दीपक चिकाणे, मदन व्यास, दिनेश लढ्ढा,तानाजी तांगडे,मधुकर पाटिल,मो.रईस ,जिवलाल निकम हे ऊपस्थित होते.