डोणगाव येथील रावसाहेब आखाडे गंभीर जखमी…
मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
शिरपूर जैन:-शिरपूर कडून करंजीकडे दारू घेऊन जाणाऱ्या भरधाव दुचाकीने करंजी कडून येणाऱ्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या घटनेत डोणगाव येथील रावसाहेब आखाडे वय ७० हे गंभीर जखमी झाल्याने जखमीला उपचारासाठी अकोला येथे देण्यात आले आहे.
शिरपूर कडून अंदाजे पाच वाजताचा दरम्यान देशी दारू घेऊन जाणाऱ्या एम एच ३७ आर ६२११ दुचाकीने करंजी कडून येणाऱ्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडके मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील ७० वर्षीय रावसाहेब आखाडे गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत त्यांना शिरपूर येथील दवाखान्या मध्ये उपचारासाठी नेले असता त्यांना प्रथमोपचार नंतर वाशिम येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. करंजी कडे दारू घेऊन जाणाऱ्या दुचाकीने धडक देऊन रावसाहेब आखाडे यांचा दुचाकीने भर दिवसा धडक दिल्याने शिरपूर परिसरात अवैध दारू विक्री किती मोठ्या प्रमाणात आहे. हे यावरून स्पष्ट होत आहे.