Friday, November 15, 2024
Homeगुन्हेगारीट्रकची दुचाकीला धडक...दुचाकीस्वार मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू...

ट्रकची दुचाकीला धडक…दुचाकीस्वार मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू…

रामटेक – राजु कापसे

रामटेक-हिवरा(बाजार) मार्गावरील नवेगाव (पुसदा पुनर्वसन)शिवारात भरधाव ट्रक ने समोरुन येत असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार (दि १५ऑक्टोबर)ला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की,मृतक मुख्याध्यापक विश्वनाथ कुंभलकर वय ३५ वर्षे रा. हिवरा(बाजार),ता. रामटेक हल्ली मुक्काम रामटेक हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ४० एस २१५८ ने हिवरा बाजार जवळ असलेल्या सालई येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कर्तव्यावर जात होते.सालई येथे ते शाळेचे मुख्यध्यापक होते.

शनिवार ला सकाळची शाळा असल्याने ते रामटेक येथून शाळेत जात असतांना समोरुन भरधाव वेगात येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३१ सीडी ५७५६ च्या चालकाने निष्काळजी पणाने चालवत असलेल्या ट्रकने दुचाकी ला जबर धडक दिली. ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार मुख्याध्यापक कुंभलकर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा घटना स्थळीच मृत्यू झाला.घटनेनंतर ट्रकचा चालक पळून गेला.घटनेची माहीती पोलीस स्टेशन देवलापार ला मिळताच पोलीस कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले.

त्यांनी मृतक विश्वनाथ कुंभलकर यांना ग्रामिण रुग्णालय देवलापार येथे हलविले व ट्रकला ताब्यात घेतले. आरोपी ट्रकचालका विरुद्ध भादंवि च्या२७९,३०४ अ व मोटर वाहन कायद्याचे सहकलम १८४, १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहायक पोलीस निरिक्षक प्रविण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात देवलापार पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मृतक कुंभलकर यांचे देवलापार पोलीसांनी शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

हिवरा बाजार या त्यांच्या मूळ गावी पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. अपघातास ट्रकची वर्दळ व रस्त्याची दुरावस्था कारणीभूत. रामटेक-मुसेवाडी-हिवरा बाजार हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे.या रस्त्यावर मोटरसायकल चालविणे हे एकप्रकारचे दिव्यच आहे.

घटनास्थळाजवळच्या चिचदा शिवारात नाल्याच्या काठावर विटभट्टे असल्याने विटांची वाहतूक करणारे ट्रक रात्रंदिवस भरधाव वेगाने या मार्गावर धावत असतात.रस्त्याची दुरावस्था व ट्रकची वर्दळ यामुळे एका तरुण,होतकरु शिक्षकास आपल्या प्राणास मुकावे लागले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: