अमरावती आणि नाशिक पदवीधर आणि नागपूर, कोकण आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठीची सकाळीच मतमोजणी सुरू झाली होती, यामध्ये अमरावती पदवीधर मतदार उशिरा झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजप दरम्यान थेट लढत दिसून येत आहे. नागपूर, अमरावती, औरंगाबाद येथील महाविकास आघाड़ी चे उमेदवार आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून मिळाली आहे.
अमरावतीत पहिल्या फेरीतील २८ हजार मतांची मोजणी सुरु झाल्यानंतर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडी 287 मतांनी आघाडीवर आहेत त्यांना एकूण 5789 मात्र मिळाली तर भाजपचे डॉ. रणजीत पाटील 5502 मते मिळाली आहेत.
पहिल्या फेरीचे निकाल हाती
भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना ११३१२ मते
माविआचे धिरज लिंगाडे यांना ११९९२ मते
६८०मतांनी माविआचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर
भाजपचे उमेदवार रणजित पाटील पिछाडीवर