पातूर – निशांत गवई
आज शहरात दुपारी तिन वाजता चे दरम्यान अचानक वादळीवारा आल्यामुळे शहरातील अनेक घरांची पडझड झाली तसेच विद्युत वाहिन्या सुद्धा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा हा खंडित झाला शहरातील नानासाहेब नगर येथे तिस ते चाळीस घरा वरील टिनपत्रे उडाली असून घरातील अन्नधान्य सुद्धा पावसात भिजून खराब झाल्याचि माहिती असून रेस्ट हाऊस रोड वरील मोठा निंबाचा वृक्ष कोलमडून रोडवरील विद्युत वाहिन्या तुटून पडल्या तसेच अकोला मार्गावरील सुद्धा अनेक निंबाचे झाडे पडल्यामुळे सुद्धा विद्युत वाहिन्या तुटल्यमुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली सदर च्या घटनेत नागरिकांचे लाखो रुपयाचि हानी झाली असल्याचि चर्चा नागरिकां मध्ये होती.
घटनेची माहिती मिळताच पातूर चे तहसीलदार दिपक बाजड यांच्या मार्गदर्शन खाली मंडळ अधिकारी अमित सबनीस, तलाठी यस. यस. तिवारी, कैलास तेलगोटे यांनी पंचनामा केला तर यावेळी माजी सभापती अनंत बगाडे, सागर रामेकर, सागर इंगळे आदी. नि यांनी सुद्धा घटनास्थळ वर जाऊन पाहणी केली तर तालुक्यातील ग्राम आगीखेड व खामखेड येथे मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे आगीखेड फाट्या वरील दोन तिन दुकाने उडून गेली असून या वादळी वाऱ्या मुळे विठ्ठल अत्तरकर यांच्या गाय वर वृक्ष पडल्यामुळे गाय जखमी झाली तर राजेश अत्तरकर यांचा बैल सुद्धा जखमी झाला असून याठिकाणी तूरळक गारपीट होऊन यात मोठ्या प्रमाणात आंबा, निंबू, संत्री, गहू, कांद्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून आगीखेड – खामखेड मार्गवर वृक्ष कोलमडून पडल्यामुळे सुद्धा रहदारी बंद झाली होती तर या ठिकाणी तलाठी एम. पि. नाईक यांनी पंचनामा केला या नुकसान ग्रस्त नागरिकांना शासन काय मदत करते याकडे लक्ष लागले आहे.