Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीउपविभागीय अधिकारी यांच्या पथकची वरली वर धाड शिक्षकासह ७ अटक १ फरार...

उपविभागीय अधिकारी यांच्या पथकची वरली वर धाड शिक्षकासह ७ अटक १ फरार…

पातूर – निशांत गवई

आज शहरात दुपार च्या वेळी उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने बाळापूर रोड वर सुरु असलेल्या वरली अड्डयावर धाड टाकून एक लाख रुपया मुद्देमाल जप्त केल्याचि घटना आज दिनांक आठ एप्रिल चे दुपारी तिन वाजता घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि शहरातील बाळापूर मार्गवर असलेल्या विजय टॉकीज जवळ खुलेआम सुरु असलेल्या वरली वर धाड टाकून यात पंजाब देवमण अवचार रा. आगीखेड रमेश तुकाराम गायकवाड रा. खामखेड,

मो. शारिक मो. शकील रा. मुजावर पुरा पातूर, भास्कर तुळशीराम माहुलीकर रा. देशमुख वेटाळ पातूर, मो. शरीफ मो. सिकंदर रा. मुजावर पुरा पातूर, संतोष लक्ष्मण कांबळे रा. भिम नगर पातूर तर राजेश नामदेव राठोड (शिक्षक )रा. रवींद्र नगर पातूर यांना अटक करण्यात आली असून मो, रुस्तम मो. उस्मान रा. शनिवार पुरा हा फरार होण्यात यशस्वी झाला असून या कारवाई मध्ये एक मोटारसायकल,सहा मोबाईल,बेंच,

खुर्च्या नगदी 1320असा एकूण 96320 हजार रुपया चा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतलाअसून फिर्यादी सै. शारिक सै. राउफ उपविभागीय अधिकारी यांच्या तक्रारी वरून वरील आरोपी विरुद्ध जुगार ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली सदर चि कारवाई p.s. i. महाजन, शारिक मेजर,सुधाकर करवते, गजानन शिंदे,विठ्ठल उकर्डे, कबीर खान, उज्वला इटीवाले यांनी केली. शहरात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध धंदे सुरु आहे यावर पातूर पोलीस अर्थपूर्ण कारवाई करीत नसल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने सदर चि कारवाई केल्याचि चर्चा नागरिकांमध्ये होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: