Monday, December 23, 2024
Homeराज्यशिक्षकाने एटीएम मध्ये केला मुलीचा विनयभंग...अहेरी येथील जिडीसिसी बँक एटीएम मधील घटना...शिक्षकावर...

शिक्षकाने एटीएम मध्ये केला मुलीचा विनयभंग…अहेरी येथील जिडीसिसी बँक एटीएम मधील घटना…शिक्षकावर गुन्हा दाखल

गडचिरोली – मिलिंद खोंड

अहेरी येथिल गडचिरोली डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या समोर असलेल्या एटीएम मध्ये हिदायत शेख असे आरोपी असलेल्या शिक्षकाने एका १९ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी ९:३० च्या सुमारास घडली.

मुलीने पोलीस तक्रारीत म्हटले आहे की आरोपी शिक्षकाने सदर इसम माझ्यासाठी अनोळखी होता आणि त्याने एका हाताने माझा हात पकडून दुसऱ्या हाताने बांधलेला स्कार्फ काढू शरीरावर इतर ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे.

सदर इसम अंदाजे पन्नास वर्षाच्या अंगावर फुल बायाच्या पांढरा शर्ट व नीडसर रंगाची फुल पॅन्ट, अंदाजे उंची साडेपाच फूट, रंग काढा, डोळ्यावर चष्मा घातलेला व अंगाने जाड अशा इसमाचे वर्णन केले जात आहे.

शिक्षकावर ३५४, ३५४(अ),३५४(ब),५०९ भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी अहेरी चे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे या तपास करत असून त्या शिक्षकाला काही जणांनी बँकेत मारहाण केल्याची माहिती आहे.

सदर शिक्षकाला उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे उपचारानंतर गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आहे.शिक्षकावर
पोलिसांनी एटीएम चे सीसीटीव्ही ताब्यात घेतले नेमके एटीएम मध्ये काय घडले याचा तपास होणार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे या करीत आहे.

अशा प्रकारे आपल्या कार्यकाळात त्या शिक्षकाने कित्येक विद्यार्थिनींवर अशा प्रकारचा कृत्य केले असेल त्यामुळे त्या शिक्षकाची संपूर्ण शाळेची चौकशी करण्यात यावे अशी मागणी सामान्य नागरिक करीत आहे.

पिढीत मुलीच्या तक्रारीवरून एटीएम मधील फोटोज् व व्हिडिओ बघून सदर घटना घडल्याचे खात्री करून पुढील तपास उपनिरीक्षक करिष्मा मोरे या करीत आहे. किशोर मानभव, पोलीस निरीक्षक,अहेरी पोलीस ठाणे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: