Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीमाझोड येथील शिक्षकेची मुलास जबर मारहाण…पातूर पोलिसात तक्रार दाखल…

माझोड येथील शिक्षकेची मुलास जबर मारहाण…पातूर पोलिसात तक्रार दाखल…

पातूर – निशांत गवई

पातूर पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेल्या ग्राम माझोड येथील उमेश खंडारे हे शेती करतात माझोड शिवरामध्ये म चार एकर शेती आहे. त्यांना एक मुलगा प्रतिक उमेश खंडारे, वय ११ वर्ष व एक मुलगी कु. निधी उमेश खंडारे, वय ६ वर्षे असे दोन अपत्ये आहेत. मुलगा प्रतिक हा श्री जागेश्वर विद्यालय, वाडेगाव या शाळेत इयत्ता ५ वी मध्ये शिकत आहे.

त्याची शाळा सकाळी ०७/०० ते २/०० वा. पर्यंत असते, तो गावातील ईतर मुलासोबत गावातील क्रूझर गाडीने जाणे येणे करतो. तसेच गावामध्ये जि.प. ची शाळा ईयत्ता पहिली ते सातवी पर्यंत आहे.

सदर शाळेवर छाया मानकर म्हणून शिक्षीका आहे. सदर शाळा सकाळी ११/०० ते संध्याकाळी ०५/०० वा. असते. सदर शिक्षीकेला चांगल्या प्रकारे ओळखतो. सदर शाळेच्या प्रांगणामध्ये गावातील लहान मोठी मुले कबड्डीची प्रक्टीस करतात.

आज दिनांक १२/१०/२०२३ रोजी माझा मुलगा प्रतिक हा दुपारी १२ / ३० वा. शाळेतून घरी परत आला, त्याने जेवण केले व थोड़ा वेळ अभ्यास केला. त्यानंतर दुपारी अंदाजे ०३/१५ वा. चे सुमारास मुलगा आमचे गावातील जि.प. शाळेमध्ये कबड्डीची प्रॅक्टीस पाहण्याकरीता गेला. त्यावेळी मी घरीच टि. व्ही. पाहत बसलो होतो.

नंतर अंदाजे दुपारी ०३/ ३० वा. चे सुमारास गावातीलच दोन तिन मुलं माझे घरी आले व मला म्हणाले की, “तुम्हाला शाळेमध्ये टिचरने बोलविले. ” मी त्यांना म्हटले की, “कशाला बोलविले?” तर त्यांनी, “आम्हाला माहित नाही असे सांगीतले. ” म्हणुन मी ताबडतोब त्या मुलांसोबतच जि. प. शाळेमध्ये गेलो.

तर त्याठिकाणी शाळेच्या आवारामध्ये माझा मुलगा प्रतिक हा मला रडत असतांना दिसला. मी त्याचे जवळ जाउन त्याला, “काय झाले?” म्हणुन विचारणा केली. तर प्रतिक याने मला सांगीतले की, “मी जि.प. शाळेच्या प्रांगणामध्ये मुलांच्या कबड्डीची प्रैक्टिस पाहत उभा होता. तर त्यावेळी सदर शाळेतील एका विदयार्थ्याशी माझा वाद झाला.

तर त्यावेळी याबाबत जि.प. शाळेतील छाया मानकर या शिक्षिकेला कोणीतरी सांगीतले. नंतर छाया मानकर यांनी दोन तिन मुलांना सांगुन शाळेमध्ये बोलविले. मी त्यांना नाही म्हटले तर त्या मुलांनी माझा हात धरून जि. प. शाळेमध्ये छाया मानकर या शिक्षीकेजवळ त्या शिकवत असलेल्या वर्गात नेले असता, त्यांनी मला कारे आमचे शाळेतील मुलांना शिवीगाळ करतो का? असे म्हटले, तर मी त्यांना, मी शिवीगाळ नाही केली, त्यांनीच मला शिवीगाळ केली असे म्हटले.

तर छाया जानकर या शिक्षीकेने मला जास्त बोलतो का? असे म्हणुन शाळेच्या वर्गाचा दरवाजा लावला व मला त्यांचेजवळील काठीने माझे उजवे खांदयावर, दोन्ही हातावर, डोक्यावर व उजवे कानावर मारहाण केली. मी रडत होतो तर माझा आवाज ऐकुन शाळेतील ईतर शिक्षक आले व त्यांनी सदर शिक्षिका ला दरवाजा उघडण्यास सांगीतले, परंतु तिने उघडला नाही. सदर वर्गात एक इसम रंगकाम करीत होता. त्याचे नाव मला माहीत नाही.

सदर इसमाने मग शाळेच्या वर्गाचा दरवाजा उघडला. त्यानंतर सदर शिक्षक यांनी मला बाहेर काढून दुस-या वर्गामध्ये नेले व तेथे माझे डोक्याचे रक्त कागदाने पुसले. त्यावेळी छाया मानकर हि शिक्षीका तेथे सुध्दा आली व तिने मला म्हटले की, तु पुन्हा जर असे केले तर मी तुझा हाप मर्डर करील व या शाळेमध्ये पुन्हा यायचे नाही.”

असे मला माझे मुलाने मला सांगीतले, माझे मुलावे डोक्यातुन रक्त निघत होते व त्याचे खांदयावर, दोन्ही हातावर चांगलाच मार लागला होता. त्यानंतर मी माझे मुलाला सरळ पोलीस स्टेशन पातुर येथे घेउन आलो व जि.प. शाळा, माझोड येथील शिक्षीका छाया मानकर यांचेविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जखमी च्या पालकांनी केली आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: