Sunday, December 22, 2024
Homeराज्यप्राचीन शास्त्रांचे अध्ययन करणारा, विद्यार्थी हा शास्त्रदूतच - प्रो. हरेराम त्रिपाठी...

प्राचीन शास्त्रांचे अध्ययन करणारा, विद्यार्थी हा शास्त्रदूतच – प्रो. हरेराम त्रिपाठी…

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात राज्यस्तरीय शास्त्रीय स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन…

रामटेक – राजु कापसे

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वतीने शास्त्रांचे जतन व संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी राज्यस्तरीय शास्त्रीय स्पर्धेचे उद्घाटन आज १६ जानेवारी २०२४ रोजी परमपूज्य गोळवलकर गुरुजी कॅम्पस, रामटेक येथे संपन्न झाले.कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या रामटेक परिसरात या राज्यस्तरीय शास्त्राीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारोहाला प्रमुख अतिथी या नात्याने आचार्य रामसलाही द्विवेदी, विभागप्रमुख, व्याकरण विभागप्रमुख, श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली, उद्घाटन समारोहाचे अध्यक्षस्थान कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी भूषविले. कुलसचिव, प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, प्रो. हरेकृष्ण अगस्ती, रामटेक परिसर संचालक, ज्येष्ठ संस्कृत विदुषी डाॅ. लीना रस्तोगी व्यासपीठावर उपस्थित होते.

स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते वेदमंत्रांच्या घोषात दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. प्रमुख अतिथी प्रो. रामसलाही द्विवेदी म्हणाले, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात आयोजित या स्पर्धेत सहभागी सर्व विद्याथ्र्यांचे मी अभिनंदन करतो. या विश्वविद्यालयाचे नाव संपूर्ण भारतात सुप्रतिष्ठित झाले आहे.

पारंपरिक शास्त्राशिक्षणासाठी गुरुकुलाची प्रतिष्ठापना आणि त्यात तयार होणारे शास्त्रात पारंगत असे विद्यार्थी हे ख-या अर्थाने संस्कृत विश्वविद्यालयाचे भूषण आहेत. भारताचा वैभवशाली बौद्धिक वारसा हा विविध शास्त्रांच्या माध्यमातून संवर्धित करण्याचे महत्त्वाचे कार्य होत असल्याचे मला समाधान आहे. यासाठी मी कुलगुरू महोदय आणि सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन करतो.

कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास तर मिळतोच पण प्रत्यक्ष शास्त्राध्यनाचा विकासही होतो. स्पर्धेतून आपले मनोधैर्य उंचावते आणि बुद्धीचा विस्तार होतोे.

अध्यक्षीय भाषणात प्रो. हरेराम त्रिपाठी म्हणाले, विश्वविद्यालयाचे ध्येय हे संस्कृत चा प्रचार प्रचार तर आहेच परंतु प्राचीन संस्कृत शास्त्रांचे संवर्धन व संक्रमणही आहे. मकरसंक्रमणपर्वावर आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय शास्त्राीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व पाठशाळा, महाविद्यालये, विद्यापीठांमधून येथे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी स्वागत व अभिनंदन करतो. शास्त्राबीजरक्षण हे गुरुकुलस्थापने मागचे उद्दिष्ट आहे.

आज वेद, साहित्य, व्याकरण, न्याय, दर्शन, ज्योतिष इ. शास्त्रांमध्ये तयार झालेले विद्यार्थी पाहता या गुरुकुलस्थापनेचे प्रयोजन सफल झाल्याचे दिसून येते. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व दिले तर आहेच परंतु प्राचीन शास्त्रांच्या अध्ययन, संशोधन, संपादन व प्रकाशनास वाव दिला आहे.

प्राचीन शास्त्रांचे अध्ययन करणारा, शास्त्रपरंपरा पुढे नेणारा प्रत्येक विद्यार्थी हा या आधुनिक युगातील शास्त्रदूतच आहे; ही परंपरा अखंडित, अक्षुण्ण राखण्यासाठी विश्वविद्यालय प्रयत्नशील आहे. प्राचीन शास्त्रे व आधुनिक विज्ञान यांच्या समन्वित संशोधन वृद्धींगत व्हावे आणि विद्यार्थ्यांनी या दिशेनेही प्रयत्न करावे असे आवाहनही याप्रसंगी मा. कुलगुरूमहोदयांनी केले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ८ संस्थांमधील ७५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

सहभागी संस्थांची नावे पुढीलप्रमाणे – के जे सोमया शैक्षणिक परिसर, मुंबई, वेदान्त विद्यापीठ, पुणे, संतसहवास वेदपाठशाळा पुणे, आचार्य वेदशास्त्र पाठशाळा, परभणी, बाबासाहेब पटवर्धन वेदशास्त्र विद्यालय, संस्कृत सेवा फाउंउेशन, पुणे, श्रीदुर्गा पाठशाळा, नांदेड आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक यांचा समावेश होता.

विविध शास्त्रीय स्पर्धांचे परीक्षण प्रमोद कुलकर्णी, रामसलाही द्विवेदी, प्रो. नंदा पुरी, डाॅ. लीना रस्तोगी, डाॅ. दिनेश रसाळ, डाॅ. संभाजी पाटील या विद्वानांनी केले या स्पर्धेत विविध शास्त्रांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, शलाका स्पर्धा, शास्त्रविचार, कंठपाठ, समस्यापूर्ती, अक्षराश्लोकी, शास्त्रास्फूर्ती स्पर्धा आदी ंमध्ये विद्यार्थी आपले शास्त्रनैपुण्याचे प्रदर्शन केले. शास्त्रीय स्पर्धेतील स्पर्धकांना विद्यापीठातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील अयोध्येत होणा-या राष्ट्रीय स्तरावरील शास्त्राीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्रा ठरले आहेत. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सचिन द्विवेदी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाच्या रामटेक कॅम्पसचे संचालक प्रा.हरेकृष्ण अगस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्राविद्यागुरुकुलम् चे संचालक डाॅ. राघवेन्द्र भट, प्रो पराग जोशी, डाॅ आशिष जे, डाॅ. श्वेता शर्मा प्रा. अमित भार्गव आणि प्रा. सचिन द्विवेदी यांनी परिश्रम घेतले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: