Monday, December 23, 2024
Homeराज्यमहा.राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन...

महा.राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

पत्रकार प्रा.रणजीत इंगळे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी…

आकोट – अकोला स्थित दिव्यांग पत्रकार प्राध्यापक रणजीत इंगळे यांच्यावर अज्ञात समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला.त्यात त्यांचा मृत्यू झाला असून या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटला आहे परंतु अजूनही त्यांचे मारेकरी फरार आहेत.

त्यांना त्वरित पकडण्यात येऊन पत्रकार प्रा.रणजीत ई़गळे यांना न्याय मीळावा याकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी,अकोट यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रा. रणजीत इंगळे यांच्यावर हल्ला केलेल्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने 25 लाखाची मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

हे निवेदन राज्याध्यक्ष गजानन वाघमारे,राज्य समन्वयक डॉ. गोपाल नारे, राज्यसचिव राजेश डांगटे,राज्य प्रवक्ते अनंत गावंडे यांचे आदेशानुसार जिल्हाध्यक्ष अँड.नरेंद्र बेलसरे,विभागीय उपाध्यक्ष अहमद शेख,जील्हाउपाध्यक्ष मनोहर गोलाईत,कमलेश राठी,यांच्या मार्गदर्शनात तालुकाध्यक्ष विठ्ठलराव गुजरकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

यावेळी महा.राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अकोट तालुका कार्याध्यक्ष अरुण काकड, गोवर्धन चव्हाण,नरेंद्र कोंडे,विठ्ठल येवोकार,सोनु पाचडे, अकोट तालुका कार्यालय प्रमुख काशिनाथ कोंडे,बाळकृष्ण तळी,शरद भेंडे,दत्ता भगत,शरद वालसींगे,गणेश बुटे, राजेश सावीकार,सोनु इंगळे,अतुल डाफे,शिरीष महाले, इत्यादींचा निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत..

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: