Sunday, December 22, 2024
Homeराज्यवंचितच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन...

वंचितच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

मूर्तिजापूर – नरेंद्र खवले

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेसंदर्भाने मूर्तिजापुर तालुकाच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात २५ जुलै रोजी चैत्यभूमी मुंबई येथून सुरू झालेली ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ” शाहूंनी दिले आरक्षण, ‘वंचित’ करेल त्याच रक्षण ” हे घोष वाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भर भ्रमण करणार असून दिनांक ५ ऑगस्ट रोजी मूर्तिजापूरात दाखल होणार आहे त्यानंतर राधा मंगलम येथे ओबीसी आरक्षण बचावाच्या संदर्भाने जाहीर सभा होणार आहे.

त्यानिमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या यात्रेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यांच्या संरक्षणार्थ मूर्तिजापूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना आज दिनांक २७ जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष सुनील सरदार, भैय्यासाहेब तायडे, दीपक खंडारे, सुनिल जाधव,अजय सुखदेवे, अशोक गिरी, मनोज तायडे, अनिल शिरसाट, सतीश खंडारे,अमोल खंडारे यांच्या सह इतरही पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: