मनसर :- येत्या वर्षातील उन्हाळ्यात ग्राम पंचायत मनसर हद्दीत पाणी टंचाई निर्माण होऊ नये,त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीचे नियोजन ग्राम पंचायत मनसर प्रशासनाने करावे.त्या करिता मागील वर्षी पूर्ण झालेली मुख्यमंत्री पेयजल योजन टेस्टिंग करून त्वरित सुरू करावी.
टेस्टिंग दरम्यान काही अडचणी आल्यास महाराष्ट्र जिवन प्राधिकरण, पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नागपूर तसेच संबंधित वर्किंग एजन्सी यांच्याशी ग्राम पंचायत प्रशासनाने संपर्क साधून आलेल्या अडचणी निकाली काढाव्यात असे निवेदनात म्हटले आहे.
सदर योजना डिसेंबर महिन्या अखेर सुरू न केल्यास जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन निर्माण करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला. त्यावेळी शिवसेना (उबाठा) चे रामटेक विधानसभा सल्लागार अरुण बन्सोड, रामटेक तालुका प्रमुख हेमराज चोखांद्रे,महिला आघाडी तालूका प्रमुख कलावती तिवारी,
ग्राम पंचायत मनसर च्या माजी सरपंच योगेश्वरी चोखांद्रे,महिला आघाडी संघटिका प्रमिला लोखंडे, माजी ग्राम पंचायत सदस्य तथा शाखा प्रमुख संगीता पंधराम,विभाग प्रमुख गंगाधरराव चवरे, शीतल मायवाडे, अरुण बागडे, कांता माटे, मनू खोकरे, विशाखा खोब्रागडे, देवा गजभिये यांच्या सह अनेक शिवसैनिक व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.