सांगली प्रतिनिधी ज्योती मोरे.
महात्मा बसवेश्वर वधू वर सूचक मंडळ कुपवाड आणि राष्ट्रीय लिंगायत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 मार्च रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात राज्यस्तरीय लिंगायत वधू वर मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाले यांनी दिली आहे.
सदर मेळाव्यासाठी महेश्वर हिंगमिरे तहसीलदार डी एस कुंभार मिरजेतील व्यापारी सुहास मजिती डॉक्टर सोमशेखर पाटील डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. रविकांत पाटील,विश्वनाथ मिरजकर, राजशेखर तंबाके, संजय हेरेकर, मिलिंद साखरपे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर मेळाव्यासाठी राज्यातील लिंगायत समाजातील वधूवरांनी आपल्या फोटोसह आणि माहितीसह उपस्थित रहावे असे आवाहन प्रदीप वाले यांनी केले आहे.