रविवारी राज्यात मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेत 11 जनाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. नवी मुंबईतील खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे १२० जणांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आता या घटनेचा Video असल्याचे नाना पटोले यांनी ट्वीट करून शेयर केला आहे.
शेयर केलेल्या व्हिडीओत संबंधित कार्यक्रम पार पडत होता तेव्हा घटनास्थळावरील परिस्थिती किती भयानक होती, अनेक माणसं, महिला कशा बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडल्या होत्या, उन्हामुळे जे लोकं अस्वस्थ झाले होते त्यांना गर्दीमुळे बाहेर काढणं अवघड झालं होतं, असं व्हिडीओत दिसतंय. संबंधित घटना ही चेंगराचेंगरीमुळे तर झाली नाही ना? असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण काही महिला बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडलेल्या या व्हिडीओत बघायला मिळत आहेत. तर त्यांच्यावर काहीजण पडताना दिसत आहेत. चेंगराचेंगरी साखरी परिस्थिती निर्माण होते की काय? असं त्या व्हिडीओत बघायला मिळतंय. तसेच जवळच रग्णवाहिका आहे. पण तरीही गर्दी इतकी असते की ज्यांची प्रकृती बिघडली आहे त्यांना रुग्णालयात घेऊन जाता येत नाही.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी ट्वीट करीत म्हणाले…महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी झालेले मृत्यू हे चेंगराचेंगरीमूळे? खोके सरकार नक्की काय लपवतंय? या सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे. मी राज्यपाल रमेश बैस यांना हे सरकार बरखास्त करण्याची विनंती करतो.
मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, कार्यक्रमासाठी लाखो लोक आले होते. त्यापैकी काही मरण पावले जे खूप वेदनादायक आहे. ते म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापालिका आयुक्त स्तरावरील अधिकारी आणि वैद्यकीय पथके पीडित आणि मृतांच्या नातेवाईकांशी समन्वय साधण्यासाठी आणि वेळेवर अद्यतने देण्यासाठी नियुक्त करण्यात आली आहेत.