गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
गोंदिया – सध्या मुस्लीम समाज बांधवांचा रमजानचा पवित्र महीणा सुरु आहे.मुस्लीम समाजात या रमजान महिण्याला फार महत्व देत असतात.या पवित्र रमजान महिण्याचे निमित्ताने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील जैन मतीन शेख या सहा वर्षाचे मुलाने सतत १३:३० तास कडक (रोजा ) उपवास पाडला आहे.
रमजानचा पवित्र महिणा १२ मार्च पासुन सुरु झाला आहे. हा उत्सव सतत एक महीणा चंद्रदर्शना पर्यंत चालत असतो. मुस्लीम समाजात पवित्र रमजानच्या महिण्याला अन्यन साधारण महत्व दिल्या जातो.सतत महिणाभर घरातील पुरुष, महीला,व सर्वलोक उपवास करणे,पहाटेला उठुन शैरी करणे, अफ्तार करणे,
सतत एक महीणा तरबिकी मज्जीत मधे जावुन नमाज पढणे,या पवित्र महिण्यात कुराणचे पठण सुध्दा केल्या जाते,एक महिण्यानंतर रमजान ईद ची समाप्ती केल्या जाते, गोठणगाव येथील जैन मतीन शेख या सहा वर्षाचे मुलाने घरातील सर्व मंडळी उपवास करीत असल्याने आपन यात सहभागी व्हावे म्हणुन १३:३० तासाचा कडक उपवास पाडुन इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे.