Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीIPS अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाने पैसे उकळ्याचा धक्कादायक प्रकार...

IPS अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाने पैसे उकळ्याचा धक्कादायक प्रकार…

छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने एका भामट्याने ऑनलाईन पैसे उकळ्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. यामध्ये बनावट ट्विटरवर अकाऊंट उघडून भामट्याने देशभरातील आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांकडून पैसे उकळले असल्याचे समोर आले आहे. यामुळे राज्यातील सायबर विभाग किती कमकुवत असल्याचे दिसत आहे.

या ऑनलाइन भामट्याने महिला आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्विटरवर खाते तयार केले होते. त्यामध्ये त्याने अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना मेसेज केले असल्याचे समोर आले आहे. त्यात त्याने गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठीचे मेसेज केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये मोक्षदा पाटील यांचे अकाऊंट असल्याचे भासवत त्याने विश्वास संपादन करून फोन पे च्या माध्यमातून पैसे मागविले आहे. यामध्ये ऑनलाइन भामट्याने मदतीच्या नावाखाली केलेली लूट पाहून पोलिस दलात खळबळ उडाली आहे. थेट पोलिसांच्याच नावाने लूट करण्याचे धाडस कुणी केले याबाबत पोलिस शोध घेत आहे.

मोक्षदा पाटील यांच्या ओळखीतील काही अधिकाऱ्यांना पैसे मागितल्याचा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी खात्री साठी विचारणा केली होती. त्यावरून हा प्रकार समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. सायबर पोलिस संशयित व्यक्तीच्या मागावर आहे.

दरम्यान या सर्व प्रकाराबाबत मोक्षदा पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी लोहमार्ग, ग्रामीण व शहर सायबर पोलिसांशी संपर्क साधून बनावट खाते बंद करण्यासाठी ट्विटरला रिपोर्ट करण्याबाबत कळविले. अनेक ठिकाणांवरून ट्विटरला रिपोर्ट गेल्यानंतर 27 मार्चला रात्री 11 वाजेदरम्यान हे बनावट खाते बंद झाले. तसेच या सायबर भामट्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. तर ट्विटरवर माझे कोणतेही खाते नसून, नागरिकांनी सायबर भामट्यांच्या पोस्टला बळी पडू नयेत, असे आवाहन मोक्षदा पाटील यांनी केले आहे. मात्र तोपर्यंत अनेकांची फसवणूक झाली होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: