Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीदोन दुचाकींच्या समोरासमोर अपघातात एक गंभीर, पातूर-बाळापूर रोडवरील घटना...

दोन दुचाकींच्या समोरासमोर अपघातात एक गंभीर, पातूर-बाळापूर रोडवरील घटना…

पातूर – निशांत गवई

पातूर : बाळापूर ते पातूर रोडस्थित असलेल्या पुरुषोत्तम फायर इंजिनिअरिंग कॉलेज समोर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे. पातूर पासून बाळापूर कडे जाताना सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरुषोत्तम फायर इंजिनिअरिंग कॉलेज समोर आज दि.13/11/2022 रोजी सुमारे 6:30 वाजताच्या दरम्यान दोन दुचाकी समोरासमोर धडकून अपघात झाला असून सदर अपघाताची माहिती पातूर येथील पत्रकार दुले खान यांना मिळाली असता त्यांनी सदरची माहिती पातूर पोलिसांना दिली,

संबंधित माहितीवरून पातूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी गेडाम मेजर,पत्रकार दुले खान युसुफ खान, परशराम देवकर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता तिथे दोन दुचाकींचा आपसांत अपघात झाल्याचे निदर्शनास आले असून एक युवक गंभीर अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले.

सदर घटनेची सविस्तर हकीकत अशी की,पातूकडून बाळापूर कडे जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच.30 एएस 1534 चा चालक सागर ज्ञानदेव अंभोरे (वय अंदाजे 20) हा गंभीर अवस्थेत असून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच.30 टी 7096 या दुचाकीस्वाराने समोरासमोर धडक दिल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून पातूर पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत या दुचाकीस्वारास स्थानिकांनी हलविले होते व घटनास्थळी सागर अंभोरे हा जखमी अवस्थेत पडून असल्याने 108 रुग्णवाहिकेस संपर्क केला असता प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे कार्यरत असलेले 108 रुग्णवाहिका चालक सचिन बारोकार व डॉ.फैजान जहागीरदार यांनी पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे नेले असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: