काल मुंब्रा येथील वाय जंक्शन पुलाच्या उद्घाटनावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आव्हाड यांना किती दिवस तुरुंगात बसाल तुम्हाला कळणार नाही अशी धमकी यांना मिळाली होती. आज पुन्हा त्यांच्यावर पोलीसांनी गंभीर गुन्हा दाखल केलाय.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून “पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दोन खोटे गुन्हे दाखल केले नाही तोच तोही 354 मी ह्या पॉलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार मी माझ्या आमदार तिचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो घेत आहे लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत” असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
तर यापूर्वी श्रीकांत शिंदेंना उद्देशून आव्हाड म्हटले होते, “आता तो मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. त्याच्याशी बोलताना सांभाळून बोललं पाहिजे. कारण यंत्रणा त्याच्याकडे आहेत. किती दिवस तुरुंगात बसाल, हे तुम्हाला कळणारही नाही, अशी धमकी आताच आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे त्यांना घाबरलं पाहिजे. सगळ्या मंत्र्यांची चौकशी करू… अशी धमकीही आताच मिळाली आहे. तुम्हाला जामीन कोण देतंय, ते बघू… अशा धमक्या मिळणार असतील तर गाव सोडून गेलेलं बरं…”असंही आव्हाड म्हणाले.