नांदेड – महेंद्र गायकवाड
डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथील सेवानिवृत्त औषध निर्मात्यास रजा रोखीकरणाचे व गट विमा बिलाचे काढलेले बिल या कामाचे बक्षीस म्हणून वीस हजार रुपयांची मागणी करणारा वरिष्ठ लिपिक गुलाब श्रीधरराव मोरे यास लाच लुचपत विभागाने लाच मागणीची पडताळणी करून ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, या प्रकरणातील तक्रारदार हे दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रूग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथून औषध निर्माता या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रूग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील प्रशासकीय अधिकारी बालाजी बोधगिरे यांनी व आरोपी लोकसेवक वरिष्ठ लिपिक गुलाब मोरे यांनी त्यांचे गट विमा योजनेचे बिल काढतो, परंतू यापूर्वी रजा रोखीकरणाचे काढलेल्या बिलाचे बक्षिस म्हणून रू. 20,000/- द्यावे लागतील.
नाही तर गट विमा योजनेचे बिल लवकर टाकणार नाही असे सांगितल्याने तक्रारदार यांनी त्यांना गटविमा योजनेचे बिल निघाल्यानंतर काढलेल्या बिलाचे बक्षिस म्हणून रू. 20,000/- देण्यास नाइलाजास्तव होकार दिला. तक्रारदार यांचे दि. 01/03/24 रोजी गट विमा योजनेचे बिल जमा झाले.
जमा झालेल्या बिलाचे बक्षिस रू. 20,000/- ही रक्कम लाच असल्याची तक्रारदार यांना माहिती असल्याने व त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे याबाबत तक्रार दिली.
त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडकडून दिनांक 2 मार्च 2024 रोजी लाच मागणीची पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान यातील आरोपी लोकसेवक वरिष्ठ लिपिक गुलाब मोरे यांनी तक्रारदार यांचे प्रशासकीय अधिकारी बालाजी बोधगिरे यांनी रजा रोखीकरणाचे व गट विमा बिलाचे काढलेले बिल, केलेल्या कामाचे बक्षिस म्हणून रू.20,000/- स्वतःचे फायदयाकरिता पंचासमक्ष मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आज दि. 27/03/2024 रोजी तक्रारदार यांना आरोपी लोकसेवक वरिष्ठ लिपिक गुलाब मोरे याच्याकडे पंचासह लाच स्विकृती साठी पाठविले असता, त्यांना संशय आल्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही.
या प्रकरणात आरोपी लोकसेवक वरिष्ठ लिपिक गुलाब श्रीधरराव मोरे यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, ता. जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरील कारवाई डॉ.राजकुमार शिंदे,
पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड.
पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा तपास अधिकारी श्रीमती स्वप्नाली धुतराज, पोलीस निरीक्षक यांनी कारवाई केली. या पथकात पोलीस निरीक्षक जमीर नाईक, प्रिती जाधव, सपोउपनि,गजेंद्र मांजरमकर,,मेनका पवार, बालाजी मेकाले,स. खदीर, अरशद खान, ईश्वर जाधव, प्रकाश मामुलवार,हे होते.