रामटेक – राजु कापसे
स्थानिक रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय, रामटेक व दमयंतीताई देशमुख बी.एड. व डी.एड. कॉलेज, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थाध्यक्ष रविकांत रागीट व प्राचार्या जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३० एप्रिल २०२४ रोज मंगळवरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राध्यापिका कला मेश्राम यांनी म्हटले की समाजप्रबोधनाच्या माध्यमातून तुकडोजी महाराज समाजातील लोकांना जागृत करण्याचे काम करत होते. या कार्यक्रमाप्रसंगी बी.ए. प्रशासकीय विभाग प्रमुख प्रा.चेतना उके, बी.एड.विभागप्रमुख प्रा.उर्मिला नाईक, डी.एड.विभागप्रमुख प्रा.शालू वानखेडे,
नॅक समनव्यक प्रा.ज्ञानेश्वर नेवारे,प्रा.किरण शेंद्रे,सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.देवानंद नागदेवे,प्रा.डॉली कळमकर,प्रा.मेघा जांभुळकर तसेच इतर प्रा.कला मेश्राम,प्रा.अमित हटवार,प्रा.अनिल मिरासे, प्रा.विलास मडावी, प्रा.मयुरी
टेम्भुरने,प्रा.आकाश मोहबिया, अतुल बुरडकर,राजेंद्र मोहनकर, गीता समर्थ, सुरेश कारेमोरे, निकिता अंबादे, निकिता फाये, सतीश कळंबे, सुनील पोटभरे, संदीप ठाकरे इत्यादिसह विद्यार्थी उपस्थित होते