Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayमार खातोय रिक्षावाला!...औरंगाबादमधील रिक्षावाल्याला भररस्त्यात कुणी तुडवलं?...

मार खातोय रिक्षावाला!…औरंगाबादमधील रिक्षावाल्याला भररस्त्यात कुणी तुडवलं?…

ऋषिकेश सोनवणे
औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात भररस्त्यात एका रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली. एका दुचाकीस्वाराने रिक्षा चालकाला किरकोळ वादातून मारहाण केली. औरंगाबाद शहरातील वरद गणपती मंदिरासमोर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरुन ही मारहाण करण्यात आली.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक इसम रिक्षा चालकाला बेदम मारहाण करताना दिसताय. यावेळी रिक्षावाल्याला रस्त्यावर लोळवून दुचाकीस्वार तरुण चोप देत होता. ही बाब लक्षात आल्यानं उपस्थितांनी मध्ये पडून हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला.पण तरिही दुचाकीस्वार तरुणाने संतापाच्या भरात रिक्षा चालकाला मारहाण करणं काही केल्या थांबवलं नाही. लाथाबुक्क्यांनी हा तरुण रिक्षा चालकावर तुटून पडला होता. अखेर रस्त्यावरील इतर लोकांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला. या भांडणात दुचाकीस्वार तरुणाचं शर्टाची बटणं देखील तुटली होती.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तरुणाची दुचाकी रस्त्यावर पडल्याचंही दिसून आलं आहे. रिक्षाचा दुचाकीला धक्का लागून तरुण दुचाकीवरुन खाली पडला असावा आणि त्यामुळे संतापलेल्या तरुणाने दुचाकी स्वाराला मारहाण करण्यास सुरुवात केली असावी, अशी शंका उपस्थित केली जातेय.

या घटनेप्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस तक्रार झाल्याची माहिती समोर आलेली नाही.महत्त्वाचं म्हणजे औरंगाबाद येथे भररस्त्यात मारहाणीच्या घटना घडलं काही नवं नाही. याआधीही अनेकही मारहाणीच्या घटना औरंगाबादेत घडलेल्या आहेत. त्याचे व्हिडीओ समोर आलेले आहेत. वारंवार औरंगाबादेत भररस्त्यात वाद होऊन मारामाऱ्या होण्याचे वाढणारे प्रकार चिंताजनक आहे. अशा घटना रोखण्याचं आव्हानंही पोलिसांसमोर आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: