शहापूर मध्ये पूर, तर मध्य रेल्वे ची रेल्वे सेवा सहा ते सात तास विस्कळीत…
शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
शनिवारी (दि. 6जुलै )मध्य रात्री पासून पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या दणक्याने ठाणे जिल्हा, शहापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळालं. रेल्वे ची कल्याण कसारा सेवा तब्ब्ल सहा ते सात बंद होती. आपत्ती व्यवस्थापन अशा ठिकाणी नापास झाल्या चे चित्र दिसून येत असल्याची भावना कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी व्यक्त केलीये.. पावसाच्या दणक्याने वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती वाहून गेल्या चे दिसून आलं आहे.
शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणहून कसारा दिशेने जाणारी रेल्वे सेवा सकाळी सात पासून विस्कळीत झाली होती . मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले होते. झाडंदेखील कोसळली होती.
याशिवाय वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरचा पोल खचल्याने वीज पुरवठा देखील बंद झाला होता . त्यामुळे वासिंद-कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूकदेखील ठप्प झाली होती .कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने शहापूर डेपो मॅनेजर यांना विनंती नुसार आटगाव येथून कल्याण पर्यंत जाण्यासाठी S.T.बसेस सोडण्यात आल्या होत्या. ..
महत्त्वाचे म्हणजे, रविवारी विशेष मेगाब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येतो. मात्र मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने मेगा ब्लॉकदेखील रद्द करण्यात आला होता.
रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने कल्याणच्या पुढे शहाड, अंबिवली, टिटवाळापासून कसारापर्यंत सर्वच रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरु व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकारी अधून मधून देत होते. रेल्वे सेवा बंद मुळे रेल्वे प्रवाशी मात्र वैतागले होते… मुंबई हुन उत्तरे कडील लांब पल्ल्याची रेल्वे सेवा दिवसभर बाधित झाली होती…
तर लोकल सेवा ही दुपारी दोन नंतर हळूहळू पूर्व पदावर येऊ लागल्याचे दिसत होते. या सर्वात रेल्वे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दिसून आली नाही असा गंभीर आरोप रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी केला आहे. शनिवारी /रविवार च्या पावसाने शहापूर शहरातील भारंगी नदीला आलेल्या पुराने गुजराती बाग, रामबाग, चिंतामणी नगर परिसरात लोकांना पुराच्या पाण्याची फटका बसला असून इमारती च्या तळमजला पाण्याखाली गेल्याचे दिसून येत होते..
यातच पुराच्या पाण्यात नागरिकांच्या चारचाकी आणि दुचाकी वाहने काही प्रमाणात वाहून गेले तर अनेक वाहने पाण्याखाली गेली. शहापूर शहरातील गुजराती बाग परिसरातील नागरिक प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते व आसनगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांनी धरणे आंदोलन केले.
यावेळी आमदार दौलत दरोडा यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरात जाऊन पाहणी केली व जिल्हाधिकारी, प्रांत तसेच तहसीलदार व संबंधित तलाठी व प्रशासनास यावर ठोस उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना देऊन नागरिकांना पाठींबा दिला व भारंगी नदीपात्रात बांधकाम करण्यासाठी परवानगी दिलेल्या प्रशासनावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. एकंदरीत पावसाच्या दणक्याने जनजीवन विस्कळीत झाल्या चे पाहायला मिळालं.