Sunday, December 22, 2024
Homeराज्यप्रखर प्रहरच्या लढ्याला उस्फुर्त प्रतिसाद...

प्रखर प्रहरच्या लढ्याला उस्फुर्त प्रतिसाद…

हेमंत जाधव

अनेक अतिक्रमण धारकांनी दिला पाठिंबा, आमच्यासाठी आंदोलन केल्या बद्दल मानले आभार काही दिवसआधी महामार्ग प्राधिकरण आणि नगर परिषद यांच्या संयुक्त पथकाने अतिक्रमण निर्मूलना ची कारवाई केली होती .त्या कारवाईत शहरातील काहीच भागातील अतिक्रमण काढून पथक रफुचक्कर झाले होते.लहान लहान व्यावसायिकांचे अतिक्रमण तोडफोड करून धनदांडग्या लोकांच्या अतिक्रमनाला हात न लावता मोहीम फत्ते केल्याच्या अविर्भावात सदर पथक रवाना झाले होते.

शहरातील पोष्ट ऑफिस समोरील सत्याच्या मधात असलेल्या अग्रवाल यांच्या पेट्रोल पंपावर कोणतीच कारवाई न करता आजूबाजूच्या लहान लहान व्यवसायिकांचे अतिक्रमण काढून टाकण्यात आले होते .त्याच प्रमाणे टिळक पुतळा परिसरातील अनेक मोठमोठे पक्के बांधकाम।केलेल्या अतिक्रमण धारकावर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्ह्ती.

शहरातील अनेक ठिकाणी मग ते नवीन बस स्टँड चा परिसर असेल केलाहिन्दी शाळेच्या समोरील परिसर असेल,जलंब नाका परिसर असेल,स्वामी समर्थ संकुल परिसर असेल,जी. एस.कॉलेज च्या समोरील परिसर असेल, की हॉटेल गौरव च्या समोरचा परिसर असेल.

सदर चे अतिक्रमण हे शहरातील धनदांडग्या आणि राजकीय लोकांचे पाठबळ असलेल्या लोकांनी केलेले आहे असे अनेक ठिकाणचे परिसतील अतिक्रमनाची माहिती प्रखर प्रहरच्या माध्यमातून गोळा करण्यात आली आणि सर्व माहितीच्या आधारे सर्वांना एकाच नियमाने कारवाई करावी या मागणीसाठी प्रखर प्रहार च्या वतीने दिनांक 26.जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

सदर च्या आंदोलनाला शहरातील अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या .दिव्यांग शक्तीसंघटनेचा,ऑल इंडिया पँथर सेना ,प्रा.सुधीर सुर्वेभ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन बुलढाणा जिल्हा ,बहुजन टायगर सामाजिक संघटना यांनी पाठिंबा दिला असून अनेक अतिक्रमण धारकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून पुढच्या आंदोलनात वरील सर्व लोक सोबत येतील अशा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.

अनेक मोठ्या नेत्यांनी अतिक्रमण धारकांना सोडले वाऱ्यावर निवडणूक आली की हात जोडून मते मागण्याऱ्या राजकीय नेत्यांना अतिक्रमण धारकांना वाऱ्यावर सोडले असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे.

आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्याच्या कडेला लहाल लहान दुकाने हातगाडी लावून संध्याकाळ पर्यंत राबराब राबून एक एक रुपया गोळा करणाऱ्या गरीब अतिक्रमण धारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज असतांना ज्यांच्याकडून आर्थिक फायदा होतो अश्या धनदांडग्या लोकांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे पाच पिढ्या बसून खातील यासाठी अतिक्रमण करून लाखो रुपये जमा करणाऱ्या लोकांच्या पाठीशी सदर चे राजकीय पुढारी असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे,

तसे जर नसते तर एखादा तरी राजकीय नेता पुढे येऊन या विषयावर अधिकाऱ्यांशी चर्चा करू शकला असता परंतु दुर्दैवाने असे होतांना दिसले नाही.एकही राजकीय मोठ्या नेत्याने उपोषण मंडपाला भेट दिली नसल्याने या नेत्यांना सामान्य गरीब अतिक्रमण धारकाचे काही घेणेदेणे नाही हे सिद्ध झाले आहे एव्हढे मात्र नक्की.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: