Friday, January 3, 2025
HomeMarathi News Todayशुभांगी ताई पाटील यांची खामगाव येथे धावती भेट...

शुभांगी ताई पाटील यांची खामगाव येथे धावती भेट…

हेमंत जाधव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवगर्जना सप्ताह महाराष्ट्र भर राबविला जात आहे या निमित्य पक्षातील नेते ठिकठिकाणी जाऊन सभा, मेळावे आणि जनसंपर्क करीत आहेत.
याच दरम्यान आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सौ शुभंगीताई पाटील चिखली कडे जात असतांना खामगाव बायपास वर शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.

या वेळी ताईंनी सांगितले की शिवसेनेचे नाव पळवले चिन्ह पळवले पण ते आम्हाला नक्कीच परत मिळणार, रावणाने सुध्दा शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता पण काय झालं हे सर्वांना माहिती आहे शिवधनुष्य हा फक्त मातोश्रीच्या देव्हाऱ्यात शोभतो. चिन्ह पाळवलं पण उद्धव साहेब आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिली त्या विचारधारेचा महाराष्ट्र आहे आणि आम्ही ही लढाई नक्कीच जिंकणार आहोत असा विश्वास दर्शवीला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: