Saturday, December 21, 2024
Homeराजकीयमूर्तिजापूर-बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघातील बौद्ध मतदारांना जाहीर आवाहन...

मूर्तिजापूर-बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघातील बौद्ध मतदारांना जाहीर आवाहन…

आपल्या मूर्तिजापूर-बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे काही लोक जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीबद्दल सामान्य मतदारांच्या मनात गैरसमज पसरवण्याचे काम करतांना दिसत आहेत. विशेषतः बौद्ध मतदारांची दिशाभूल करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बौद्धांनी वंचितला मतदान करू नये किंबहुना बौद्धांची मत मोठ्या प्रमाणात विभाजित व्हावीत म्हणून वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत…मुर्तिजापूर तालुक्यातील समस्त बौद्ध जनतेला मी नम्र विनंती करतो की, महाविकास आघाडीच्या कोणत्याही भूलथापांना आपण बळी पडू नये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या महाराष्ट्रात स्वातंत्र्य आंबेडकरी राजकारण उभेच राहू द्यायचे नाही हे लक्षात ठेवा. स्वातंत्र्य आंबेडकरी राजकारण उभे झाल्यास यांच राजकीय अस्तित्व धोक्यात येईल याची मोठी भीती त्यांच्या मनात आहे…

बौद्धांच्या मनात वंचित बहुजन आघाडी तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून बौद्धांची मत मिळवण्याचा हा नीच प्रकार इथे सुरू आहे…बौद्धांची मत मिळवण्यासाठी ही लोक कोणत्याही स्थराला जाऊ शकतात. तालुक्यात अनेक ठिकाणी यांचा हा नीच अपप्रचार जोरदार सुरू आहे..तालुक्यातील बौद्ध जनता महाविकास आघाडीच्या या नीच अपप्रचाराला किंवा यांच्या आमिषाला अजिबात बळी न पडणार नाही याची मला खात्री आहे. मुर्तिजापूर बार्शीटाकळी हा मतदारसंघ सुरवातीपासून वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. आज या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. सुगत वाघमारे यांच्या झंझावाताने महाविकास आघाडी पुरती हादरून गेली आहे हेच यातून दिसून येते…

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना रोखण्याचा याआधी कित्येक वेळा अयशस्वी प्रयत्न केला गेला आहे. येणाऱ्या २० तारखेला आपल्याला मतदान करायचे आहे. आपले मतदान फक्त आणि फक्त गॅस सिलेंडरलाच झाले पाहिजे याची काळजी घ्या…जर ही लोकशाही तसेच इथल्या बहुजनांचे आरक्षण आपल्याला वाचवायचे असेल तर लोकशाहीला व संविधानाला मानणारे लोकच या देशाच्या सत्तेत गेले पाहिजे नाहीतर आपल भविष्य खुप मोठ्या धोक्यात आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

बौद्धांनो आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना आपल्या सोबतीची नितांत आवश्यकता आहे. आज साहेबाची तब्येत बरी नसतांना सुद्धा ते या अवस्थेत पायाला चाक बांधून प्रचार करण्यासाठी फिरतायेत ते केवळ तुमचे मूलभूत हक्क वाचवण्यासाठी याची आपण जान ठेवा…पुढच्या दोन तीन दिवसात तुमच्याकडे अनेक लोक येतील आणि तुम्हाला वाटेल ते आमिष देण्याचा प्रयत्न करतील. हात जोडून सांगतो मित्रांनो महाविकास आघाडीला मत देवून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याच पाप करु नका…आपल्या हक्काचा व आपल्याच पक्षाचा आमदार करण्याची ताकत तुमच्यात आहे हि ताकत ओळखा…आज आलेली संधी उद्या येणार नाही म्हणून सांगतो…तुमच्याकडे येणाऱ्या लोकांच्या आमिषाला व भूलथापांना बळी पडून आपल्या येणाऱ्या पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका…

आपल्याला कोणाबद्दल काही अडचणी असतील किंवा आपले काही प्रश्न असतील तर आपण मला फोन करा…आपण भेटून त्यावर चर्चा करून त्यातून काहीतरी मार्ग निश्चित काढू याची ग्वाही देतो…विनाकारण निर्माण झालेल्या गैरसमजातून आपले तसेच आपल्या पक्षाचे नुकसान करु नका ही हात जोडून विनंती करतो…

आपला हितचिंतक.
सतिश विनायकराव गवई.
खापरवाडा.
9987997000.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: