Monday, December 9, 2024
Homeराज्यशोधक पत्रकारिते मधला अनमोल पत्रकार काळाने हिरावला..!

शोधक पत्रकारिते मधला अनमोल पत्रकार काळाने हिरावला..!

महा.राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे पत्रकार बांधवांनी वाहली सामूहिक श्रद्धांजली

अकोट – पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून सामाजिक क्षेत्रात तळागाळातील लोकांना सर्वोतोपरी न्याय देण्याचे काम पत्रकारचे असुन पाहण्यास मिळतात समाजातील बहुसंख्येने पत्रकार असून शोधक पत्रकारिता व जनसामान्य तथा शेतकरी व कामगार वर्ग यांना न्याय देण्याचे खरे कार्य करत पत्रकारांच्या हातून सतत घडत असते याचप्रमाणे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आकोट तालुक्यातील सावरा या गावातील सर्व परिचित असलेले शेतकरी संघटनेचे प्रतिष्ठित नागरिक तथा जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव गणपतराव गुजरकार यांचे वयाच्या ७२ वर्षी अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा गुरुवार दि.२८ रोजी सायंकाळी ८.४५ मि.दुःखद निधन झाले.

त्यांना गेल्या चार ते सहा दिवसापासून अमरावती येथे खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असतांना त्यांनी इहलोकीची यात्रा संपवीली त्यांच्या निधनाची वार्ता पंचक्रोशीत समजताच शोककळा पसरली विठ्ठलराव गुजरकार हे महा.राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष व जिल्हाउपाध्यक्ष पद भूषविले होते संघटेनेतील सर्व पत्रकार मंडळींना सोबत घेवून त्यांनी संघटनेच्या बळकटीसाठी विशेष योगदान दिले समाजकंटकाकडून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ले संदर्भात शासन दरबारी त्यांचे कडून सातत्याने आवाज उठवीण्यात आला.

सामाजिक, राजकीय तथा गोरगरीब शेतकऱ्यांसाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय होते.त्यांनी १९८६ मध्ये शरद जोशी व प्रकाश पोहरे यांनी शेतकरी संघटनेसाठी मोलाचे कार्य केले तब्बल१४ दिवस ते त्यांनी तुरुंगवास भोगला हे विशेष !शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ललित बहाळे व सर्व पदाधिकाऱ्यांकडून पार्थिवावर शेतकरी संघटनेचा ध्वज अंथरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

सावरा येथील सरपंच म्हणून त्यांची सुनबाई सौ.स्वाती वैभव गुजरकार विराजमान असुन अल्पावधीतच विकास कामे करण्यात सुद्धा त्यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या पक्षात पत्नी ,दोन मुले व एक मुलगी, सुना व नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

यावेळी महा. राज्य ग्रा. पत्र. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गजानन वाघमारे, राजेश डांगटे नरेंद्र कोंडे, अरुण काकड, शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, प्रशांत पाचडे, राजेश नागमते, दिलीप बोचे, राजेश भालतिलक, शंकरराव चौधरी, रामदास काळे, पत्रकार मनोहर गोलाईत, गजानन राऊत,राजेश साविकार,राजेश रावणकार, डॉ. गजानन महल्ले तथा महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व पदाधिकारी राजकीय तथा सामाजीक क्षेत्रातील बहुसंख्येने जनसागर अंत्ययात्रेत उसळला होता.

जेष्ठ पत्रकार विठ्ठलराव गुजरकार शेतकरी संघटनेत असतांना शेतकऱ्यांप्रति त्यांचे कार्य प्रशंसनीय होते सामाजीक कार्य तथा शोधक पत्रकारीता नेहमी स्मरणात राहील ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो!

प्रकाश पोहरे संपादक दै. देशोन्नती तथा शेतकरी नेते,

स्वच्छ प्रतिमा बहुआयामी आदर्श व्यक्तिमत्त्व विठ्ठलराव गुजरकार यांचे देहावसान झाल्याचे वृत्त कळताच .सहजासहजी विश्वास बसत नव्हता.या वयातही पत्रकार संघटना बळकटीसाठी व वाढीचे काम गौरवास्पद आहे पत्रकार कुटुंबातील सर्वांचे ज्येष्ठ सदस्य विठ्ठलराव गुजरकार या नावाने हरपला.

गजानन वाघमारे ( प्रदेशाध्यक्ष )
महा. राज्य ग्रामीण पत्रकार
संघ (आकोला)

संघटना म्हणून त्यांनी शेतकरी संघटनेचेच काम केले संघटनेचा पदाधिकारी ज्यावेळी जातो त्यांना शेतकरी संघटनेच्या झेंड्यात आम्ही पाठवतो संघटनेच्या झेंड्यात पार्थिवाला लपेटून त्यांना भावपूर्ण निरोप दिला,

ललित दादा बहाळे अध्यक्ष शेतकरी संघटना

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: