लाखपुरी – मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन कडुन २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे . त्या करिता शासनाकडुन आधार प्रमाणीकरण (e-KYC) सहज व सोपे होण्यासाठी सेतु मध्ये केवायसी करण्याकरिता प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये नाव असल्यास कागदपत्रे घेवून सेतु व आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) मध्ये जावून प्रमाणीकरण (e-KYC)करून घेता येते.
सदर याद्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्यात आल्या आहे. तालुक्यातील लाखपुरी सह लाखपुरी सर्कल मधील लाखपुरी , दातवी , लाईत , खुदावंतपुर , रसलपुर , रेपाटखेड , मंगरुळकाबे , जांभा ,दुर्गवाडा , सांगवी वाघझडी सह लाखपुरी सर्कल मधील खुप मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नाव आधार प्रमाणीकर यादीत नाहीत.
त्या शेतक-याचे नाव सदर यादीत समाविष्ट करणे साठी आज दि. २३-०८-२०२३ ला उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर व तहसीलदार मुर्तीजापुर यांना लाखपुरी व लाखपुरी सर्कल च्या शेतकऱ्यां कडून निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात शेतकऱ्याचे म्हणणे आहे की ज्या शेतक-यांचे नाव नाहीत त्यांचे नाव सदर यादीत समाविष्ट करण्यात यावे व यामध्ये जर कुणाच्या हलगर्जीपणामुळे शेतक-यांचे नाव आले नसेल तर त्या संबधितावर कारवाई करावी व सदर निवेदनाची दखल ८ दिवसात निकाली न निघल्यास लाखपुरी येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाछा इशारा या निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन पि एल . सिरसाट प्रणीत ग्रामिण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अतुल नवघरे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी लाखपुरी सर्कल मधील निरंजन चव्हाण , प्रकाश राजपुत , शे. रहिम , अनिलसिंह चौहान , महादेव नवघरे , संदिप इंगळे ,रोशन वानखडे , अमिता इंगळे , सतिषसिंह चौहाण , मिरा चौहाण , देविदास वानखडे , अजय तायडे ग्रा.प. सदस्य सह शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते.
लाखपुरी व लाखपुरी सर्कल मधील सन २०२२ मधील नैसर्गिक आपत्ती मदती यादी आली आहे . परन्तु त्या यादी मध्ये बहुतांश शेतकऱ्याचे अजुनही नाव नाहीत तरी लाखपुरी सर्कल मधील ज्या शेतकऱ्याचे नाव नाहीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात यावे . सौ. मिनल चं.नवघरे (माजी. पंचायत समिती सदस्य लाखपूरी