सांगली – ज्योती मोरे
सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत आज ऑटो स्पेअर पार्टसह गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या एकास अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, अमित सुरेश सूर्यवंशी वय 30 राहणार पंचशील नगर सांगली याच्या गाडीत चार बॅटऱ्या असून त्या कमी दरात विक्री करण्यासाठी गिर्हाईक शोधत असल्याबाबतची माहिती खास बातमीदाराने दिल्यानुसार ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे.
त्याच्या जवळील एम एच 10, सीए 3619 या 800 चार चाकी गाडीत शोधाशोध केली असताना फ्युजन आणि स्कायटेक कंपनीच्या 29 हजार रुपये किमतीच्या चार बॅटऱ्या मिळून आल्या.
सदर बॅटर्यांबाबत विचारणा केली असताना त्या चार ते पाच दिवसांपूर्वी त्याच्या साथीदारासमवेत जाऊन माधवनगर रोडवरील कलानगर इथल्या ऑटो इलेक्ट्रिकल दुकानाचे शटर उघडून चोरल्याचे त्याने कबूल केले.
त्याच्याकडून 29 हजारांच्या बॅटऱ्यांसह गुन्ह्यात वापरलेली दोन लाख रुपये किमतीची मारुती 800 ही गाडी असा एकूण दोन लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .आरोपीसह मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे,अनिल कोळेकर, संतोष गळवे,विक्रम खोत,संदीप गुरव,बिरोबा नरळे, जितेंद्र जाधव,सागर लवटे,सागर टिंगरे, उदय माळी, हेमंत ओमासे, संदीप पाटील, आदींनी केली.