Monday, December 23, 2024
Homeराज्यनांदेड मध्ये उद्या मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने भीमा कोरेगाव फेम झी युवा...

नांदेड मध्ये उद्या मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने भीमा कोरेगाव फेम झी युवा संगीत सम्राट गायक अजय देहाडे यांचा बुद्ध-शिव-भीम गीतांचा कार्यक्रम…

नांदेड – महेंद्र गायकवाड

तरोडा (बू) येथील विजयनगर कल्याण नगरच्या पाठीमागे मैदानात मंगेश कदम मित्रमंडळाच्या वतीने उद्या काळजावर कोरलं नाव आमचा भीमा कोरेगाव फेम अजय देहाडे यांचा तुफानातले दिवे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंगेश कदम मित्र मंडळाच्या वतीने संयोजन समितीचे अँड.धम्मपाल कदम यांनी केले आहे.

तथागत भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून मंगेश कदम मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजता तरोडा (बु) येथील विजय नगर मैदानात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी मंत्री डी. पि. सावंत व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे उपस्थीत राहणार आहेत.

विशेष अतिथी म्हणून आ. मोहन अण्णा हंबर्डे , माजी आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर,बि. आर. कदम,किशोर स्वामी,आनंद चव्हाण,दिलीप पाटील बेटमोगरेकर , मंगाराणी ताई अंबुलगेकर,सौ.मिनलताई खतगावकर, निलेश पावडे,संजय देशमुख लहानकर,विजय येवनकर,संजय बेळगे,

विठ्ठल पाटील डक,अनिताताई इंगोले, कविता ताई कळसकर,नवल पोकर्णा, सतीश देशमुख तरोडेकर, माधवराव देशमुख तरोडेकर, गोविंदराव देशमुख तरोडेकर,किशोर भवरे,सखाराम तुप्पेकर,रमेश गोडबोले,संतोष पांडागळे, सुरेश हटकर, संजय कौठेकर,संतोष मुळे, सुभाष पाटील,राजकुमार येंगडे, मनोहर पवार,

प्रफुल्ल सावंत यांच्यासहित अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक मंगेश कदम,

संयोजन समितीचे ॲड.धम्मपाल कदम, डॉ. विलास राज भद्रे,महेंद्र गायकवाड, मनीष कदम, अरविंद सरपाते, शाहीर आनंद कीर्तने, आनंद सावंत सावकार,विक्की गायकवाड यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: