- शुक्रवारी घडली घटना.
- तीन दिवसान पासून तालुक्यात सतत मुसळधार पाऊस.
- नदी, नाल्यांना आला पूर.
- बैल जोडीचा अजूनही पता लागलेला नाही.
- महादेव कृष्णा कुमेरिया यांची बैलजोडी.
नरखेड – अतुल दंढारे
तीन दिवसा पासून नरखेड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्याना पूर आला आहे. घोगरा येथील शेतकरी महादेव कृष्णा कुमेरीया शुक्रवारला बैलजोडी घेऊन शेतात गेले होते.
सायंकाळी ६ वाजता शेतातून परत येत असताना बैलजोडी घराकडे जात असताना शेताकडे असलेल्या नाल्याला अचानक पूर आल्यामुळे बैलजोडी वाहून गेली असून अजून पर्यंत बैलजोडी सापडलेली नाही.
बैलजोडी नाल्यातून नदीत वाहून गेल्याची शक्यता असून बैलजोडीचा शोध घेणे सुरू आहे. जवळपास बैलजोडी 80 हजार रुपयांची असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.