Saturday, November 23, 2024
Homeमनोरंजननाट्य-सिने-मालिका-जाहीरात या क्षेत्रात होतकरू कलाकारांसाठी निर्माण करणार नवे व्यासपीठ…!

नाट्य-सिने-मालिका-जाहीरात या क्षेत्रात होतकरू कलाकारांसाठी निर्माण करणार नवे व्यासपीठ…!

मुंबई – गणेश तळेकर

कलाकार यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व त्या अनुषंगाने भविष्यात त्यांना संधीही उपलब्ध होऊ शकेल. ह्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ” विनामूल्य एक दिवसीय अभिनय / तंत्रज्ञ मार्गदर्शन शिबीर ” शनिवार दिनांक १० जून २३ रोजी संध्या.५ ते ८ या कालावधीत किते भंडारी सभागृह, गोखले रोड, छ. शिवाजी पार्क, शिवसेना भवनच्या समोर, दादर ,पश्चिम मुंबई . येथे आयोजित केले होते.

ह्या मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन प्रमुख अतिथी मालवणी भाषा सातासमुद्रपार पार नेणारे मालवणी नटसम्राट लेखक-दिग्दर्शक-कलाकार श्री गंगाराम गवाणकर , प्रसिद्ध विनोदी अभिनेते, दिग्दर्शक , निर्माते श्री विजय पाटकर प्रमुख उपस्थितांमध्ये हजर होते…!

तसेच पदाधिकारी श्री विनोद चव्हाण , श्री प्रकाश कांबळी , श्री जगदीश आडवरीकर , रेखा मॅडम , सुषमा मॅडम , कित्ते भंडारी हॉल पदाधिकारी , व अनेक मान्यवर यांनी उपस्थिती दर्शवली.

महासंघ लेखक-साहित्यिक- नाटककार प्रा.डॉ. प्रदीप ढवळ, निर्माता-लेखक-दिग्दर्शक संदीप वाईरकर, गायक – सुधीर मांजरेकर, लेखक-दिग्दर्शक आबा पेडणेकर व नंदा आचरेकर, अभिनेता – सुनील मेळेकर , रुपेश मिरकर , मोहन आचरेकर , कॅमेरामन- तुषार विभूते , संगीतकार – गजेंद्र मांजरेकर, पप्पा पाटेकर , रंगभूषा -मानसी सुर्वे, कवियत्री – सौ.अलका नाईक ,

लेखिका-अभिनेत्री, विजया कुडाव व विद्याताई मंत्री, नेपथ्यकार सुधाकर मांजरेकर इत्यादींचे मार्गदर्शन लाभणार लाभले. महासंघाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख – गणेश तळेकर ह्यांनी ही प्रस्तावना करत मार्गदर्शन केले.

होतकरू कलावंतांनी महासंघाच्या कार्यशाळेत प्रवेश करून उत्कृष्ट अशी कामगिरी करतील , व त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याची तयारी महासंघाने दाखविली आहे असे महासंघ अध्यक्ष श्री नविनचंद्र बांदिवडेकर साहेब यांनी समारोप भाषण करताना सांगितले….!

पुढील २० नोव्हेंबर २०२३ मध्ये अखिल भारतीय भंडारी समाज महासंघार्फे १० दिवसीय अभिनय / तंत्रज्ञ शिबिर आयोजित करण्यात येत आहे त्यासाठी कोणालाही भाग घ्यायचा असल्यास संपर्क करा
संपर्क-
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ :- ९०२९३१९१९१,९९२०११४४०५, ९८६९५२५८१८.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: