Thursday, September 19, 2024
Homeराज्यरामटेक | गरजू रुग्णांसाठी रक्तदानातून मानवतेचा संदेश...

रामटेक | गरजू रुग्णांसाठी रक्तदानातून मानवतेचा संदेश…

रामटेक – राजू कापसे

शिवस्वराज्य दूध संकलन केंद्राच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी (वन्यजीव), डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना आवळेघाट, आकाशझेप फाउंडेशन रामटेक व इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय, रक्तपेढी नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने १३ मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरात २५ व्यक्तींद्वारा शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णांच्या निशुल्क सेवेसाठी ऐच्छिक रक्तदान करून मानवतेचा कृतिशील संदेश दिला तसेच केक कापून शिवस्वराज्य दूध संकलन केंद्राचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

mahavoice-ads-english

यावेळी आकाशझेपचे सचिव साक्षोधन कडबे यांनी बोलताना, “उन्हाळ्यातील दिवसात रक्ताची वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा बघता तरुणांनी ऐच्छिक रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा” असे आवाहन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विष्णू सहारे (सरपंच), वंदनाताई भूर्रे (पोलिस पाटील), नरेश बानेवार (आयसीआयसीआय फाऊंडेशन), रोहिदास चौहान (वनरक्षक), अनिकेत मैंद (संचालक,स्व.दू.सं.केंद्र), शिशुपाल बेदरे (अध्यक्ष वन समिती) हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या शिबिरात शिशुपाल बेदरे, रोहिदास चौहान, कमलेश राऊत, सतीश राऊत, शिवदास बगमारे, शुभम दुपारे, प्रफुल्ल राऊत, अभिजीत मैंद, राहूल भागडकर, स्वप्नील बेदरे, प्रेम राऊत, अनिकेत मैंद, विशाल राऊत, अरुण राऊत,

अजय राऊत, श्रीजय दुपारे, समीर राऊत, प्रिन्स राऊत, श्यामकुमार राहाटे, पियुष किरपान, संकेत राहाटे, पंकज कारेमोरे, दीपक राऊत, साक्षोधन कडबे यांनी ऐच्छिक रक्तदान केले. आयजीजीएमसीच्या बीटीओ डॉ. मानसी लुळेकर आणि चमूने उत्तमरित्या रक्त संकलन केले.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: