सांगली – ज्योती मोरे
स्वतःच्या सेवा पुस्तकातील जन्मतारखेत फेरफार करून सेवानिवृत्तीचा कालखंड नऊ महिने वाढवून घेणाऱ्या निरीक्षक जयश्री माने यांच्यावर कडक कारवाई करण्यात येऊन,त्यांच्याकडून नऊ महिन्यांच्या पगारासह इतर आर्थिक लाभ व्याजासह वसूल करण्यात यावा., माथाडी मंडळाकडे कंत्राटी भरती ऐवजी रिक्त जागांची कायमस्वरूपी भरती करण्यात यावी, ही भरती करताना नोंदणीकृत हमाल तोलाईदार महिला माथाडी कामगारांच्या मुला-मुलींना प्राधान्य देण्यात यावं.
या मागण्यांसाठी आज सकाळी सांगली जिल्हा माथाडी आणि असुरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयावर सांगली जिल्हा हमालपंचायत च्या वतीने मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष विकास मगदूम यांनी केलं.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर, हमाल पंचायत उपाध्यक्ष राजू बंडगर,तोलायदार सभेचे उपाध्यक्ष आज आदगोंडा गोंडाजे,सेक्रेटरी श्रीकांत पुस्तके,भारत गायकवाड, विठ्ठल यमगर, शिवाजीराव सावंत, शामराव पेटर्गी, श्रीशैल माळी आदी मान्यवरांसह हमाल तोला इधर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.